अग्निशामक विभाग

Select FIRE SAFETY

लहान मुलांकरिता आगीपासून सुरक्षेसाठी टिप्स

आग आणि भाजण्यापासून प्रतिबंध

 • गरम भांडं किंवा वस्तूपासून लांब राहा.
 • उकळते पाणी, गरम तेल यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा .
 • गरम द्रव्य पिण्यापुर्वी त्याचे तापमान तपासा.
 • गॅस किंवा चुलीपासून लांब राहा.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून घ्यावयाची काळजी

 • पालकांना विचारल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करु नका.
 • कपडे किंवा बूट ओले असतील तर इलेक्ट्रॉनिक उपकरणे हातात घेऊ नका
 • तारा किंवा कॉर्ड्स जळत असल्याचे आढळून आले तर त्वरित पालकांना कळवा
 • तुमचे बोट, खेळणी किंवा इतर एखादी वस्तू इलेक्ट्रिक सॉकेटला लावू नका

फटाक्यांपासून सुरक्षा

 • फटाके पेटवण्यासाठी मोठी उदबत्ती वापरा
 • हातभर अंतर ठेऊन फटाका पेटवा
 • एखादी मोठी व्यक्ती सोबत असल्याशिवाय फटाका पेटवू नका
 • फटाके वाजवताना अग्नीमुळे पेट न घेणारे सुती कपडे घाला
 • पहिल्यांदा फटाका पेटला नाही तर पुन्हा पेटवायला त्याच्या जवळ जाऊ नका
 • घर आणि झाडांपासून लांब मोकळ्या मैदानावर फटाके वाजवा
 • फटाके वाजवताना सोबत बादलीत माती भरुन ठेवा. आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

ज्वालांपासून सुरक्षा

 • पेटलेल्या मेणबत्त्या किंवा दिवे फर्निचर, पलंग, पडदे, कारपेट आणि इतर वस्तूंपासून लांब ठेवा
 • काडेपेटी आणि लाईटरपासून लांब राहा
 • झोपण्यापुर्वी मेणबत्ती आणि दिवे विझवा

आग पेटल्यास घ्यावयाची काळजी

 • पेट घेतलेल्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाऊ नका
 • धुरामुळे समोर काही दिसत नसेल तर रांगत लवकरात लवकर घराबाहेर पडा
 • तुम्ही जर पेटलेल्या इमारतीमध्ये असाल तर बाहेर पडण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा
 • पुणे शहरातील अग्निशमन दल(101) आणि अॅम्ब्युलन्स(108) संपर्क क्रमांक लक्षात ठेवा