वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

अग्निशमन संग्रहालय 

पुणे शहराचा इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणणारी अनेक संग्रहालये सध्या अस्तित्वात आहेत. कै. केशवराव नारायणराव जगताप अग्निशमन संग्रहालयाच्या स्थापनेनंतर त्यात आणखी मोलाची भर पडली आहे. शहरातील एरंडवणे अग्निशमन केंद्राच्या आवारात याअग्निशमनसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पानशेत धरण आपत्तीदरम्यान वापरलेले रोल्स-रॉस व्हिंटेज अग्निशमन यंत्र असो किंवा इतर संबंधित यंत्रे या संग्रहालयात उपलब्ध आहेत. या संग्रहालयाची स्थापना १८ डिसेंबर, २०१६ रोजी झाली होती. याशिवाय, संग्रहालयाच्या स्थापनेमागे अग्निशमन दलाची कार्यपद्धती, जुनी व नवी उपकरणे, आपत्तीकाळात वापरले जाणारे तंत्रज्ञान इत्यादींविषयी जनजागृती निर्माण करणे हाही एक उद्देश आहे.

या संग्रहालयात पुणे अग्निशमन दलाचा इतिहास, आग नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी विविध यंत्रे, चित्रे, मॉडेल्स आणि पॅनल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याशिवाय, संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी अग्निशमन दलाचे कामकाज दाखविण्यासाठी स्वतंत्र परिसराची तरतूद करण्यात आली आहे. चेहरा नसलेल्या कर्मचार्यांचे पुतळे, जुन्या उपकरणांपासून तयार करण्यात आलेली गणपतीची मुर्ती ही संग्रहालयात काही प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय, नागरिकांना विविध बचावकार्यादरम्यान वापरण्यात आलेल्या शंभरहून अधिक पुरातन उपकरणे येथे पाहायला मिळतील. याशिवाय, अग्निशमन दलाचा इतिहास, कार्यपद्धती, दलातील कर्मचार्यांना आणीबाणीच्या परिस्थितीबाबतचे प्रशिक्षण याचे प्रशिक्षण दिले जाते याबाबतदेखील माहिती देण्यात आली आहे.