Projects

Select Projects

लुल्लानगर येथील उड्डाणपूल

या उड्डाणपूलाची लांबी ४९० मीटर असून हा पूल पुणे कॅंटोनमेंट मार्गे कोंढवा रस्ता ते लुल्लानगर चौकात बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपूलाला एकूण ४ कमानी आहेत. त्यापैकी २ कमानी ३० मीटरच्या तर एक गाळा २५ मीटर आणि एक गाळा २० मीटरचा असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १४.९३ कोटी रुपये असून त्यापैकी २०१६-१७ या वर्षात अंदाजे ७ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. हे काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
पुणे महानगरपालिकेच्या विशेष प्रकल्प कक्षातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होणार आहे. स्वारगेट, पुणे स्थानक, कॅम्प रस्ता, एनआयबीएम रस्ता, कोंढवा गाव आणि प्रस्तावित रिंग रोड (कात्रज ते फुरसुंगी) येथील वाहतूक कोंडी दूर होऊन कोणत्याही अडथळा किंवा सिग्नलशिवाय पार करता येणे शक्य होणार आहे. यामुळे लुल्लानगर चौकात वेळोवेळी सिग्नलला होणारी वाहतूक कोंडी दूर होऊन सिग्ननला प्रदूषणात प्रतिक्षा करत थांबणार्‍या वाहनांची सुटका होणार आहे.

प्रकल्पाची सविस्तर माहिती
अ) पूलाची लांबी: ४९० मीटर
ब) पूलाची रुंदी: १५ मीटर
क) दोन्ही बाजूचा रस्ता (अॅप्रोच रस्ता): ३८५ मीटर
ड) एकूण गाळे : ४ (३० मीटरच्या २ कमानी, २५ मीटरचा एक गाळा, २० मीटरचा एक गाळा)
          उच्च पातळीवरील लांबी: १०५ मीटर

 ई ) बांधकामाचा प्रकार: पूर्वनियोजित, प्रिट्रेस्ड ग्रिडर
 च ) अँटीक्रश बॅरिअर: १ मीटर उंची