Projects

Select Projects

स्वारगेटवरील फ्लायओव्हर

पुणे एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पापद्वारे (आयआरडीपी) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने पुण्यातील काही कामे हाती घेतले आहे. त्यासाठी नियोनज विभागाने परिपत्रक क्रमांक पासूस 2000/प्र.क्र.3/का.1474(3), दिनांक २३/०२/२००१ द्वारे २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्वारगेटचा उड्डाणपूल हा या प्रकल्पाचा पहिला भाग आहे. निधीच्या कमतरतेमुळे हा प्रकल्प वेळेत सुरू होऊ शकला नाही. पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाला अनामत रकमेतून हा प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली आणि ४० कोटी रुपये अनामत रक्कम म्हणून जमा केले. 

पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामध्ये १/११/२०११ रोजी करार झाला. त्यानुसार प्रकल्प व्यवस्थापन कन्स्लटन्सीसाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदांची तपासणी केल्यानंतर ३१/१२/२०११ रोजी एस. एस. भोसले अॅण्ड असोसिएटस यांना हे काम देण्यात आले. आवश्यक ती निविदापूर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर बांधकाम आणि डिझाईनसाठीच्या निविदा काढण्यात आल्या. या कामाची कार्यादेश १० जून २०१३ रोजी मेसर्स एनसीसी लि. यांना देण्यात आले. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव क्र. ९१ दि. २२/४/२०१३ मान्यता दिली. 

 

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये

 

 1.  अंदाजित खर्च:  एकत्रितपणे रुपये ९८.८५ कोटी; टक्केवारीचा दर: २८.१४ कोटी रुपये
 2.  प्रकल्पाची किंमत: रुपये १५७.८५ कोटी
 3.  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने मान्य केलेली निविदा: १३९ बीओडी, दिनांक २८/०२/२०१३
 4.  निविदा किंमत: रुपये १२६.९९ कोटी (एकत्रित रु. ९९ कोटी, बी-१ रुपये २७.९९ कोटी)
 5.  सल्लागाराचे नाव: मे. एस.एस.भोबे आणि असोसिएटस प्रा. लि.
 6.  कंत्राटदाराचे नाव: मे. एनसीसी लि.
 7.  कार्यादेश: दि. १०/०६/२०१३
 8.  निश्चित करून दिलेला कालावधी: ३० महिने
 9.  पूर्ण करण्याची निश्चित दिनांक: ९/१२/२०१५
 10.  संपूर्ण प्रकल्पाला ३१/०३/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 11.  उड्डाणपूलाबद्दलची माहिती
  • मोठा उड्डाणपूल (सातारा रस्तापासून हडपसर आणि सारसबाग रस्त्यापर्यंतची वाहतूक) लांबी: १२६१ मी, रुंदी ७.५ मी 
  • लहान उड्डाणपूल (जेधे चौकापासून सातारा रस्त्यापर्यंतची वाहतूक) लांबी: ५२५ मी, रुंदी ७.५ मी
 12. भुयारी मार्ग (व्हीयुपी) (एकूण २): सातारा रस्त्यावर ४४५ मी, लांबी: ७.५ मी 
 13. पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग (पीयुपी) (एकूण २): 
  •  सातारा रस्त्यावर पीयुपी- लांबी: ४२ मी, रुंदी १४ मी, उंची २.९ मी
  • शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पीयुपी: लांबी ८ मी, उंची २.९ मी

कामाची सद्यस्थिती

लहान आणि मोठा उड्डाणपूल तयार झाला असून तो अनुक्रमे २० जून २०१५ आणि २७ मे २०१६ पासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मोठ्या उड्डाणपूलावरून एक मार्ग सारसबागेच्या दिशेने तर एक मार्ग हडपसरच्या दिशेने जातो.

एकूण ४४५ मी वाहनांसाठीच्या भुयारी मार्गापैकी ७८ मीटर रस्ता जेधे चौकातून जातो. स्वारगेट बस स्थानक आणि टिळक रस्त्यावरील प्रस्तावित दोन  पादचाऱ्यांसाठीचे भुयारी मार्ग प्रस्तावित मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे स्वारगेट येथे स्थानक होणार असल्याने रद्द करण्यात आले आहेत. वाहनांच्या तळरस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. पण जानकी हॉल, हडपसरच्या रस्त्यावरील शौचालय, सातारा रस्त्यावरील हुंदेकरी इमारत, साई मंदिराच्या समोरील २३ दुकाने यांचे अतिक्रमण आहे. सर्व्हिस रस्त्याच्या निर्मितीसाठी ही अतिक्रमणे काढावी लागणार आहेत.

उड्डाणपूलाची निर्मिती १०० टक्के झाली आहे. एकूण प्रकल्प ७७.२५% पूर्ण झाला आहे.

आतापर्यंत ९९.९० कोटी रुपये खर्च झाले आहेत. (वाढीव दर आणि सामग्रीसाठीचा अग्रीम + पुणे महानगरपालिका शुल्क)

पुणे महानगरपालिकेकडून आतापर्यंत ९९.९० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. अद्याप ३६ कोटी रुपये येणे बाकी आहे.

Swargate-Flyover-Image Swargate-Flyover-Image Swargate-Flyover-Image Swargate-Flyover-Image Swargate-Flyover-Image Swargate-Flyover-Image