सांस्कृतिक केंद्र विभाग

Select CULTURAL CENTERS

गणेश कला क्रीडा मंच

पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात विस्तारलेल्या गणेश क्रीडा कला मंच सांस्कृतिक केंद्राची आसनक्षमता तब्बल 2,400 आहे. केंद्रावर भव्य सभागृहासोबतच विविध प्रदर्शनांसाठी दोन प्रदर्शन हॉल उपलब्ध आहेत. या हॉलमध्ये कपडे, हस्तकला, खादी ग्रामोद्योग उत्पादने, दागिने, शैक्षणिक व घरगुती उत्पादने, तांत्रिक शिक्षण, करिअर मार्गदर्शनासंबंधी विविध प्रदर्शने आयोजित केली जातात.

गणेश क्रीडा कला मंच सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम तसेच कॉर्पोरेट आणि व्यवसाय सेमिनारसाठीदेखील उपलब्ध आहे.

पत्ता: नेहरु स्टेडियम शेजारी, स्वारगेट, पुणे, महाराष्ट्र 411042

गुगल नकाशा : https://goo.gl/zxikun

उद्घाटन सोहळा :

 शुक्रवार, 28 ऑगस्ट, 1998

यांच्या हस्ते :

  मा. मनोहर जोशी,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 संपर्क :

 020 - 24447712

 

सभागृहाविषयी माहिती

सभागृह

व्यासपीठाचा आकार

 60’ x 40’ x 35’ फूट

प्रदर्शन हॉल क्र. 1

 10,200 चौरस फूट

प्रदर्शन हॉल क्र. 2

 7,000 चौरस फूट

 

सभागृहाची आसनक्षमता - 2400

सभागृहातील सुविधा

 • अकौस्टिक फॉल सिलिंग ट्रीटमेंट आणि एअर कुलिंग सिस्टम
 • नव्या सुविधा- डॉल्बी साऊंड सिस्टम, प्रोजेक्शन सिस्टम आणि मोटोराईज्ड स्क्रीन
 • विशेष पाहुण्यांसाठी वातानुकुलित व्हीआयपी रुम्स
 • मेकअप रुम्स- 2(वातानुकुलित)
 • बारा प्रवेशद्वारांसह सभागृहात अग्निरोधक यंत्रणा
 • वाहनतळावर ‘पे अँड पार्क’ सुविधा
 • आठ सुरक्षा कर्मचारी(तीन शिफ्टमध्ये), पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत या लोकांना वेतन दिले जाते
 • दोन प्रदर्शन हॉल उपलब्ध

कार्यक्रमाच्या वेळा

गणेश क्रीडा कला मंच सभागृह मोठ्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. अशा कार्यक्रमांसाठी विविध पातळ्यांवर तयारी आवश्यक असते. यादरम्यान, सभागृहामध्ये आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लागणारा वेळदेखील लक्षात घ्यावा लागतो. यामुळेच, सभागृहासाठी दोन टाईम स्लॉट उपलब्ध आहेत.

सकाळी

स. 9.00 ते दु. 2.00

संध्याकाळी

सायं. 5.00 ते रात्री 10.00

सभागृहासाठी भाडेदर

ठराव क्र.

स्थायी समितीच्या 7 सप्टेंबर, 2000 च्या ठराव क्रमांक 1248 आणि 23 ऑक्टोबर, 2000 रोजीच्या ठराव क्र. 296 नुसार भाड्याचे खालील दर निश्चित करण्यात आले आहेत.

क्र.

कार्यक्रम

प्रस्तावित भाडेदर

ध्वनी व्यवस्थेसाठी नवा प्रस्तावित भाडेदर

 1. 1.

परिषद, खाजगी कंपनी आणि व्यावसायिक कार्यक्रम

प्रतिदिन रु. 25,000/-

रु. 15,000 प्रति कार्यक्रम ( केवळ 5 तासांठी) + सेवा कर

रु.10,000( संपुर्ण दिवससाठी)

रु.6,000 (5 तासांसाठी)

       2.

 • शालेय, माध्यमिक आणि प्राथमिक शाळा(शैक्षणिक कार्यक्रमांसाठी)
 • धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, व्याख्यान, सत्कार कार्यक्रम, बॉडी शोज्, क्रीडा संघटनांचे तालुका, जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवरील इतर कार्यक्रम, गझल मैफील, फॅशन शो, बॅलेट, हिंदी ऑर्केस्ट्रा

रु. 15,000 प्रति कार्यक्रम ( केवळ 5 तासांठी) + सेवा कर

रु.6,000 (5 तासांसाठी)

       3.

मराठी आणि इतर भाषांमधील नाटके, मराठी भावगीते, सुगम संगीत कार्यक्रम, भारतीय नृत्य प्रदर्शन, राजकीय पक्ष व संघटनांच्या परिषदा, लावणी आणि तमाशाचे कार्यक्रम

रु. 10,000 प्रति कार्यक्रम ( केवळ 5 तासांठी) + सेवा कर

रु.1,500 (5 तासांसाठी)

B)

 • प्रदर्शन हॉल क्र.1, सुमारे 10,200 चौरस फूट क्षेत्रफळ
 • प्रदर्शन हॉल क्र.2, सुमारे 7,000 चौरस फूट क्षेत्रफळ

रु. 15,000 प्रतिदिन+सेवा कर

रु.10,000 प्रतिदिन+ सेवा कर

 

C)

कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी बिनव्याजी रु.10,000 अनामत रक्कम म्हणून ठेवणे आवश्यक

 

 

D)

वर नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावित भाडेदराशिवाय, विजेच्या वापरासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल

रु.9.00 प्रति युनिट

 

 

सभागृहाचे 15,000 रुपये भाड्याशिवाय(5 तासांकरिता), ध्वनी यंत्रणा आणि प्रोजेक्शन यंत्रणेसह संपुर्ण यंत्रणेसाठी रु.15,000 अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

अतिरिक्त बाबींसाठी भाडे

क्र.

अतिरिक्त बाबी

प्रमाण

सध्याचा भाडेदर

1.

व्ही.आय.पी. रुम

5 तासांसाठी

500/-

2.

व्ही.आय.पी. खुर्ची

1

20/-

3.

टेबल

प्रति सत्र

25/-

4.

प्लॅटफॉर्म / लेव्हल

1

20/-

5.

व्हिडिओ शुटिंग (कनेक्शन चार्जेस)

प्रति सत्र

300/-

6.

रांगोळीची स्वच्छता

 

200/-

7.

स्क्रीन

1

600/-

8.

लाकडी स्टूल

1

10/-

9.

बाहेरील फाटकावर कमान

 

500/-

10.

स्पीकर सिस्टम

5 तासांसाठी

1,250/-

11.

आतील कॅन्टीन

1 दिवस

1,000/-

(सर्व भाडेदरावर सेवा कर लागू आहे)

आरक्षणासंबंधीचे धोरण

कार्यक्रमाच्या नियोजित तारखेपुर्वी सहा महिने आधी सभागृह आरक्षित करणे बंधनकारक आहे. आधी अर्ज करणाऱ्यां प्राधान्य दिले जाईल.

दुरुस्ती आणि देखभाल

सभागृहासंबंधी सर्व देखभाल आणि दुरुस्त्यांची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना, बांधकाम परवाना आणि विद्युत विभागाकडे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा - व्यवस्थापक

दूरध्वनी क्रमांक - 020 – 24447712