उद्यान स्वच्छता सप्ताह

उद्यान स्वच्छता सप्ताह

भारतातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने `स्वच्छ भारत अभियान' संपूर्ण देशामध्ये राबविलेले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत `स्वच्छ भारत अभियान २०२०' अंतर्गत `उद्यान स्वच्छता सप्ताह' दिनांक २४ जून ते २९ जून २०१९ दरम्यान साजरा करण्यात आला. यामध्ये परिमंडळ क्रमांक १ ते ५ मधील एकूण ६० उद्यानांमध्ये हा स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आला. या अभियानात शालेय विद्यार्थी, युवावर्गासह पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. स्वच्छतेबाबतची जाणीव होणे व कच-याचे वर्गीकरण होणे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

या अभियानाबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.