समाज विकास विभाग

Select WOMEN AND CHILD WELFARE LAWS

घरटं प्रकल्प

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तसेच त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने 2007 सालापासून निवासी प्रकल्प (घरटं प्रकल्प) सुरु केला.

सध्या खालील तीन ठिकाणी घरटं प्रकल्प सुरु आहेतः
१. श्री श्रीमाळ दवाखाना, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे-०६ (जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) – दूरध्वनी क्र. ९८२२०१४४७१
२. भोलागीर विद्यालय, मनपा शाळा क्र. ४, सोमवार पेठ, पुणे-११ (एकलव्य बाल शिक्षण न्यास) – दूरध्वनी क्र. ९५४५२२३६३६
३. मनपा शाळा क्र. १०० बंटर स्कूल, हडपसर गाडीतळ, पुणे-२८ (बचपन बचाओ संस्था) – दूरध्वनी क्र. ९९६०३४२२३२

या प्रकल्पासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, वीज, शालेय साहित्य व कामगारांचे वेतन अशा विविध सुविधांची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना पुणे महानगरपालिकेकडून आर्थिक मदत केली जाते. या प्रकल्पासाठी लागणारा १०० टक्के खर्च पुणे महानगरपालिकेतर्फे केला जातो.
याशिवाय, प्रकल्पात राहणाऱ्या मुलांसाठी वरील तीन ठिकाणी आंघोळीसाठी गरम पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, या मुलांची शैक्षणिक प्रगती थांबू नये यासाठी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये या मुलांना शिक्षण दिले जाते. वर्षातून एकदा ससून हॉस्पिटलमध्ये सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून दरवर्षी सामाजिक संस्थांशी करार केला जातो. समाजविकास विभागाचा गट समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते महिन्यातून दोनवेळा याप्रकल्पाला भेट देतात. यावेळी प्रकल्पाच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याची सुचना केली जाते. सामाजिक कार्यकर्त्यामार्फत प्रकल्पाचा मासिक अहवाल सादर केला जातो.

 


योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः
१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४