माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

जीआयएस वृक्षगणना प्रकल्प

कामाची व्याप्ती-

पुणे महानगरपालिकेने भौगोलिक स्थानावर (जिओ-इनेबल्ड) आधारित वृक्षगणनेचा सर्व्हे करण्याचे नियोजन केले आहे. तसेच ही माहिती शहराच्या नकाशावरही दाखविण्यात येणार आहे. `एसएएआर आयटी’ यांना या सर्व्हेचा डॅशबोर्ड आणि सर्व ब्राऊजरना सोयीची अॅप तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. हा प्रकल्प उद्यान विभागाचा असून यातून पुणे शहराचा एकत्रितपणे सर्व्हे करण्यात येणार आहे. डॅशबोर्डद्वारे सुरु असलेल्या प्रकल्पांची, कामांच्या स्थितीची, विविध प्रकारचे लेआऊट आदींबाबत माहिती प्राप्त होणार आहे.

या प्रकल्पाच्या व्याप्तीबाबत –

  • पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व वृक्षांना जिओ-टॅगिंग
  • वृक्षाची जात, स्थान, व्यास, लागवडीची दिनांक इत्यादी प्रकारानुसार माहिती शोधण्याची सुविधा
  • वृक्षांची छायाचित्रे
  • वृक्षांसदर्भातील कामांवर प्रत्यक्ष देखरेख ठेवण्याची सुविधा