क्रीडा विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

क्रीडा साहित्य खरेदीसाठी अनुदान

क्रीडा साहित्य खरेदीसाठी अनुदान

पुणे शहरातील खेळाडूंना दैनंदिन सराव, क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडील मान्यताप्राप्त शासकीय व खाजगी क्रीडा संस्थांना क्रीडा साहित्य खरेदी, व्यायामशाळेचे बांधकाम व व्यायामशाळा अद्ययावत करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या संस्थांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम क्रीडा समितीच्या मान्यतेने ठरवली जाईल. याशिवाय, कोणती संस्था पात्र आहे किंवा संस्थेची निवड करण्याचे अधिकार पुर्णपणे क्रीडा समितीला राहतील. पुणे महानगरपालिकेकडील प्रचलित धोरणानुसार संबंधित संस्थेची आर्थिक परिस्थिती पाहून संस्थेस अनुदान उपलब्ध करून देण्याचे अधिकार क्रीडा समितीला राहतील. प्रतिवर्षी किमान १,००,००,०००/- रूपये पर्यंतच्या अनुदानाची तरतूद क्रीडा समितीमार्फत करण्यात येईल. एका संस्थेस जास्तीत जास्त ५,००,०००/- रूपये पर्यंत तरतुद करून द्यावी. संस्थांची संख्या जास्त असल्यास पुढील वर्षात काही संस्थांना अनुदान देण्यासाठी विचार करण्यात येईल. शासकीय/खाजगी संस्थांना अनुदान उपलब्ध करुन दिल्यानंतर मनपाने खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत खेळाडु तसेच राज्यस्तरीय / राष्ट्रीय खेळाडू यांना मनपाने ठरवुन दिलेल्या सवलतीच्या दरात अथवा मोफत सरावासाठी साहित्य उपलब्ध करुन देणे.