क्रीडा विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

हॅन्डबॉल स्टेडियम

हॅन्डबॉल स्टेडियम

पुणे महानगरपालिकेने हडपसर परिसरात २००५ साली हॅन्डबॉल स्टेडियम विकसित केले आहे. हे मैदान खेळाडूंना हॅन्डबॉलच्या सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय  अनेक स्थानिक नागरिक सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी या मैदानाचा वापर करतात. लवकरच या स्टेडियमचे सुशोभीकरण करण्यात येणार असून भोवताली चालण्यासाठी ट्रॅक व प्रत्यक्ष मैदानावर लॉन लावण्यात येणार आहे. य़ाशिवाय या परिसरात खुली व्यायामशाळा तयार करण्याचा तसेच नागरिकांना व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून देण्याचा पुणे महानगरपालिकेचा उद्देश आहे.