पथ विभाग

Select Projects

उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग ( एच.सी.एम.टी.आर.)

उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग ( एच.सी.एम.टी.आर.)

उच्चतम क्षमता द्रुतगती मार्गाद्वारे(.सी.एम.टी.आर.) पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक महत्त्वपुर्ण रस्ते जोडण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहराचा 37 किलोमीटरचा पट्टा आहे. प्रामुख्याने वाहतूकीला गती मिळावी यासाठी या रस्त्यांचा उपयोग केला जाणार आहे. या मार्गावर मेट्रो, बीआरटी किंवा लाईट रेल(एलआरटी) धावतील. या योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

  • पुणे महानगरपालिकेने 1987-1982 दरम्यान ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन’मधील वाहतुकीसंबंधी गरजांचा सखोल अभ्यास केला होता. यावरुन उच्चतम क्षमता द्रुतगती मार्गाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे
  • प्रस्तावित उच्चतम क्षमता द्रुतगती मार्गाला महापालिकेचे पहिले प्राधान्य असून या मार्गाला शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि इतर 60 आवश्यक मार्ग जोडले जाणार आहेत
  • हा मार्ग खडकी, औंध, शिवाजीनगर, एरंडवणे, कोथरुड, कर्वेनगर, दत्तवाडी, पर्वती, बिबवेवाडी, वानवडी, सॅलिसबरी पार्क, हडपसर, मुंडवा, कल्याणी नगर, येरवडा आणि कळस भागातून जाणार आहे
  • या मार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.