Projects

Select Projects

होळकर पुल

आधी अस्तित्वात असलेला होळकर पूल हा मूळा मुठा नदीवर बांधण्यात आलेला १६० मीटर लांब व ८.८ मीटर रुंदी असलेला अरुंद दगडी पूल होता. या पूलावर गर्दीच्या वेळेत अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असे. पुलाचे बांधकाम जुने झाले होते व तसेच पाण्याच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण होत होता. या पूलावरुन येरवडा ते खडकी बाजार, शिवाजी नगर ते विश्रांतवाडी आणि खडकी बाजार ते शिवाजी नगर मार्गावर जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरु असते.

पुणे महानगरपालिकेने त्याठिकाणी उड्डाणपूल व नदीवरील पूलाचे बांधकाम केले आहे. यामुळे विविध परिसरात ये-जा करणारी वाहतूक सुरळित होण्यास मदत झाली आहे. या पूलाला आयसीआय बिर्ला सुपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पूलाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे-

तपशील

पूल 1

पूल 2

 

येरवडा ते शिवाजीनगर

येरवडा ते खडकी

शिवाजीनगर/खडकी ते येरवडा

पूलाची लांबी

234.560 मीटर

399.320 मीटर

183.120 मीटर

कमानींची संख्या

शिवाजीनगर वळणासाठी
4 + 2

12

5

कमानीची लांबी

36.36 मीटर - पहिली

36.36 मीटर – पहिली

36.36 मीटर – दुसरी

36.80 मीटर – चौथी

36.80 मीटर – चौथी

36.80 मीटर - तिसरी

30.00 मीटर - दुसरी

30.00 मीटर - पाचवी

 

 

36.20 मीटर - पहिली

 

अप्रोचेसची लांबी

येरवडा बाजू - 80.429 मीटर

येरवडा बाजू - 79.620 मीटर

येरवडा बाजू - 105.452 मीटर

शिवाजीनगर बाजू - 240.513 मीटर

खडकी बाजू - 183.707 मीटर

खडकी बाजू - 125.393 मीटर

एकुण = 320.942 मीटर

एकुण = 263.327 मीटर

एकुण = 230.845 मीटर

पूलाची एकुण लांबी

555.502 मीटर

662.647 मीटर

413.965 मीटर

सध्या अस्तित्वात असणारा पूल वारसा म्हणून जतन करण्यात आला आहे. कमी वजन असणाऱ्या हलक्या वाहनांसाठी खुला आहे. पहिला पूल २९.२.२०१२ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि दुसरा पूल २१.४.२०१२ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या प्रकल्पासाठी एकुण 6620.26 लाख रुपये खर्च आला. 

holkar-bridge

holkar-bridge