मनुष्यबळ विकास व्यवस्थापन यंत्रणा

मनुष्यबळ विकास व्यवस्थापन यंत्रणा (एचआरएमएस)पुणे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने कर्मचार्‍यांच्या सेवांची माहिती आणि नोंदणी करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामध्ये सेवेसंदर्भातील कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा आहे. तसेच ही कागदपत्रे पुणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना वापरता येतात.  खालील माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदविण्यात येते -

 • कर्मचार्‍याचे पूर्ण नाव, पत्ता आणि संपर्काची माहिती
 • नियुक्तीची तारीख
 • सेवेचा प्रकार
 • नियुक्तीच्या वेळी असलेले पद
 • शैक्षणिक पात्रता
 • आरक्षणाचा प्रकार
 • अपंगत्वाबद्दलची माहिती
 • कार्यरत असलेल्या विभागाचे नाव
 • पदोन्नतीची तारीख
 • पदोन्नतीनंतरचे पद
 • पे स्केल
 • पॅन कार्ड, आधार कार्ड, कर्मचारी कार्ड क्रमांक
 • विभागीय परीक्षेची माहिती
 • मिळकत परतावा
 • गोपनीय अहवाल

लाभ: पुणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांच्या सेवेसंदर्भात आवश्यक तेव्हा आवश्यक त्या प्रकारचे अहवाल प्राप्त करून घेता येतात.