प्रकल्पाची पार्श्वभूमी :
- चांदणी चौक हा राष्ट्रीय महामार्ग - ४ वरून पुण्यामध्ये येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठीचे मुख्य केंद्र आहे.
- एनडीए, पाषाण, कोथरुड, मुळशीवरून येणारी वाहतूक येथूनच वेगवेगळ्या दिशेला जाते.
- सर्व बाजूंनी येणार्या वाहतूकीमुळे येथे नेहमीच वाहतूककोंडी होते.
- या परिसराचा वेगाने विकास होत असल्याने येथे वाहतूकीचा गोंगाट होतो.
- चांदणी चौक परिसराचा भूभाग डोंगराळ आहे त्यामुळे सध्याच्या रस्त्याच्या दुरूस्तीची मर्यादा आहे.
- मोठ्या वाहतुकीमुळे हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे.
- येथे अनेक मोठे घातक अपघात झालेले आहेत.
- या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी वेळोवेळी करतात.
- ही समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सल्लागारांमार्फत कृती आराखडा तयार केला आहे.