भारताची जनगणना २०२१

भारताची जनगणना २०२१

पुणे महानगरपालिकेच्या ३४०.४५ चौ.कि.मी. क्षेत्रा अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक २०१७ प्रभाग क्रमांक १ ते ४२ चे सीमा आधारभूत धरून १५ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात जनगणना २०२१ प्रस्तावित आहे. जनगणना दोन टप्यात होणार असून टप्पा क्रमांक १ मध्ये घराची यादी व घराची गणना दिनांक. १ मे ते १५ जून २०२० व टप्पा क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना दिनांक ९ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार आहे.जनगणना २०११ चे लोकसंख्येच्या आकडेवारीत अंदाजित ४०% वाढ लक्षात घेऊन ३३,७१,६२६ *४०% प्रमाणे ४७,२०,२७६ या लोकसंख्येवर ६०० लोकसंख्या व १५० कुटुंबे (घरे) या साठी १ प्रगणक या प्रमाणे ७८६७ प्रगणक व ६ प्रगणकांसाठी १ पर्यवेक्षक या प्रमाणे १३११ पर्यवेक्षक हे प्रत्यक्ष क्षेत्र कामकाजासाठी नियुक्त केले जाणार आहेत.सदर गणने साठी नेमलेले प्रगणक केंद्र शासनाने तयार केलेल्या विहित नमुन्यात महिती संकलनासाठी प्रत्येक घरोघरी येऊन प्रश्न विचारणार आहेत तरी विचारलेल्या प्रश्नाची माहिती रहिवासीयांनी देऊन सहकार्य करावे.

 

पुणे महानगरपालिका क्षेत्र

३४०.४५ चौ.कि.मी.

आधारित सार्वत्रिक निवडणूक २०१७ प्रभाग

१ ते ४२

चार्ज शहर जनगणना कार्यालये (क्षेत्रीय कार्यालय)

१५

टप्पा क्रमांक १:- घरयादी घरांची गणना

दि.१ मे ते १५ जून २०२० 

टप्पा क्रमंक २:- लोकसंख्या गणना

दि.९ ते २८ फेब्रुवारी २०२१

अंदाजित लोकसंख्या जनगणना २०११ चे लोकसंखेच्या ४०% प्रमाणे ३३७१६२६*४०%

४७,२०,२७६

६०० लोकसंख्या व १५० घरांसाठी (कुटुंबासाठी)

१ प्रगणक(७८६८ अंदाजित गट)

६ प्रगणक गटासाठी

१ पर्यवेक्षक (१३११ पर्यवेक्षक )

एकूण क्षेत्र अधिकारी (नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक )

९१७८

जनगणना करण्याची उद्दिष्टे

  • भारत एक कल्याणकारी राष्ट्र आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सामान्य माणसाच्या हितासाठी पंचवार्षिक योजना,वार्षिक योजना आणि वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.या सर्वांसाठी तळागाळापर्यंतची माहिती असणे जरुरीचे आहे आणि ही माहिती जनगणने व्दारेच उपलब्ध होते.

  • संसद /विधानसभा ,पंचायत ,नगरपालिका,महानगरपालिका व इतर स्थानिक क्षेत्रातील मतदार संघाची संख्या निश्चित करणे ,मतदार संघाचे सीमांकन करणे साठी जनगणनेत संकलित केलेल्या माहितीचा उपयोग केला जातो.

  • घरयादी व घरांची गणना अत्यंत उपयोगी आहे यामुळे मानवी निवासाच्या परिस्थितीचा बहुव्यापक आकडा मिळतो,निवासी घरांची कमतरता त्यामुळे घरकुल योजनेची आकडेवारी ठरविता येते.कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या सोयी व मालमत्तेसंबंधी आकडेवारी मिळते.याचा उपयोग स्थानिक व राज्य स्तरांवर योजना बनविण्यासाठी उपयोगी पडते.

  • जनगणनेच्या आकडेवारीचा उपयोग अभ्यासक,व्यापारी ,उद्योगपती,योजनाकार,आणि निवडणूक अधिकारी इत्यादींच्या आवश्यकतासुद्धा पूर्ण करते.

जनगणना 2021 अधिसूचना

  • केंद्र शासन अधिसूचना, भारताचे महारजिस्टर यांचे कार्यालय नवी दिल्ली ,दिनांक २६ मार्च २०१९

  • महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार –क दिनांक १४ मे,२०१९

  • का.आ.१४५५(अ)- केंद्र सरकारचा जनगणना अधिनियम ,१९४८ (१९४८ चा ३७) च्या कलम ३ व्दारा प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून घोषणा करीत आहे की,भारताच्या लोकसंख्येची जनगणना वर्ष २०२१ च्या दरम्यान केली जाईल.जनगणनेसाठी संदर्भ तिथी जम्मू आणि काश्मिर राज्य तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील बर्फाच्छादित असमकालिक क्षेत्र वगळून मार्च, २०२१ च्या प्रथम दिवशी ००-०० वाजता असेल.

  • परंतु असे कि, जम्मू आणि काश्मिर राज्य तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील बर्फाच्छादित असमकालिक क्षेत्रांसाठी,संदर्भ तिथी ऑक्टोबर,२०२० च्या प्रथम दिवशी ००-०० वाजता असेल .