पुणे : भारतातील सर्वांत स्वच्छ शहरांमध्ये ५वे

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत पुणे हे ४९००.९४ गुणांसह ५ वे स्वच्छ शहर ठरले आहे. २०२० च्या अहवालानुसार पुणे १५ व्या क्रमांकावर होते

 

img
 
img
 
 

शहराने स्वच्छतेबाबतीत केवळ आपला दर्जाच सुधारला नाही तर १० ते ४० लाख लोकसंख्येच्या श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट सेल्फ-सस्टेनेबल (स्वयं-शाश्वत) शहराचा पुरस्कार देखील मिळवला. गार्बेज फ्री सिटी (GFC) रेटिंगमध्येही शहराने थ्री स्टार रेटिंग मिळवले आहे. सिटिजन्स  वॉइस श्रेणीमध्ये शहराने १८०० पैकी १५४० गुण मिळवले आहेत, तर १ लाखाहून अधिक लोकसंख्येच्या महानगरपालिकांमध्ये पुणे आठव्या क्रमांकावर आहे.  

 

img
 
img
 

 

 

केंद्रीय नगरविकास विभागाने स्वच्छतेच्या पद्धतींवर आधारित शहरांची क्रमवारी (रॅंकिंग) जाहीर केली. प्रशासन आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच क्रमवारीत ही सुधारणा झाली आहे.