इंद्रधनुष्य

 

पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करुन आणि जबाबदार नागरिकत्वास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेची सार्वजनिक सुविधा .

पुणे शहराचा शाश्वत विकास करण्याच्या दिशेने पावले उचलत पुणे महानगरपालिकेने ‘इंद्रधनुष्य’ पर्यावरण आणि नागरिक केंद्र सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याद्वारे समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा व नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण करण्याचा महापालिकेचा हेतू आहे. यामुळे, पुणे शहराच्या पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल, असे आम्हाला वाटते.

इंद्रधनुष्याची भूमिका

 • पर्यावरण शिक्षण
 • पर्यावरणविषयक माहिती देणे
 • पर्यावरणाची व्याप्ती
 • नागरिकांसाठी व्यासपीठ
 • पर्यावरण संगोपन

A. इंटरप्रिटेशन सेंटर :

इंद्रधनुष्य सभागृहाची रचना पर्यावरण संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये थ्रीडी प्रदर्शने, पॅनल्स, माहिती फलक, विविध उपक्रम, चित्रपट इत्यादीचा वापर करण्यात आला आहे. इंद्रधनुष्यमध्ये शहरातील यंत्रणा, त्याचा पर्यावरणाशी संबंध तसेच नागरी व्यवस्था सुरळित चालण्यासाठी नागरिकांचा आवश्यक सहभाग याविषयीची माहिती देण्यात आली आहे. विविध थीम्सद्वारे पुणे शहराचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची झलक दाखविण्यात आली आहे.

इंद्रधनुष्यमधील प्रदर्शने :

 • पुणे शहराचा इतिहास आणि वारसा
 • स्थानिक शहर प्रशासन
 • शहरी जैवविविधता आणि इको-सिस्टीम
 • पाणी आणि कचरा पाणी व्यवस्थापन
 • स्वच्छता
 • घनकचरा व्यवस्थापन
 • रहदारी आणि वाहतूक
 • ऊर्जा आणि हवामानातील बदल

B. बांधकाम रचना :

इंद्रधनुष्यची इमारत बांधताना पर्यावरणाची सखोल काळजी घेण्यात आलेली आहे. इमारतीभोवती मोठ्या प्रमाणावर हिरवळ आहे. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकाम करताना या झाडांच्या फांदीलादेखील धक्का लागलेला नाही.

 • ग्रंथालय: इंद्रधनुष्यच्या ग्रंथालयात नागरिकांसाठी अनेकविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत.
 • सभागृह : इंद्रधनुष्यच्या सभागृहामध्ये सुमारे 70 ते 80 लोकांना एकावेळी बसता येईल. सभागृहात प्रोजेक्टरची सुविधा असून त्यावर पर्यावरणविषयक चित्रपट, माहितीपट, प्रेझेंटेशन्स आणि प्रोग्राम्सचे आयोजन केले जाते.
 • मोकळी जागा: इंद्रधनुष्यचा संपुर्ण हिरवागार आणि प्रसन्न परिसर पाहण्याजोगा आहे. या परिसरात असणार्या प्रत्येक वृक्षावर त्याचे सामान्य नाव, वैज्ञानिक नाव आणि त्याचा उपयोग इत्यादी गोष्टींची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. यातून नागरिकांना वृक्षांबाबत अधिक सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 • याशिवाय, इकोफ्रेंडली संकल्पनांचा विस्तार करण्यासाठी लवकरच गांडूळखत, रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबविण्याचा इंद्रधनुष्यचा मानस आहे.

C. उपक्रम:

इंद्रधनुष्य केवळ स्वतःचे उपक्रम राबवत नाही तर नागरिकांना आणि सामाजिक संस्थांना विविध पर्यावरणविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मदत करते. या सभागृहात पर्यावरणाशी निगडीत विविध विषयांवर चित्रपट, माहितीपट दाखविले जातात. तसेच, पर्यावरणाशीसंबंधित औचित्य असल्यास विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून पाहिले जाते आणि पर्यावरणाशी निगडीत उपक्रमांसाठी मोफत सभागृह उपलब्ध करुन दिले जाते.

अनेक परदेशातील विद्यार्थीदेखील इंद्रधनुष्यला भेट देतात. या भेटीत त्यांना पुण्याच्या पर्यावरणाविषयी माहिती दिली जाते.