सांडपाण्यासंदर्भातील जोडणी आणि दुरुस्तीबाबतची माहिती

दुरुस्तीबाबतची माहिती

क्रमांक

प्रश्न

माहिती

सांडपाण्याच्या गळती किंवा दुरुस्तीबाबत मी कोठे तक्रार करू शकतो?

 1. पुणे महानगरपालिकेकडे तुम्ही विविध माध्यमातून तक्रार करता येते.

 • संकेतस्थळ: complaint.punecorporation.org

 • ट्विटर: @PMCCare

 • फेसबुक: @PMCPune

 • व्हॉटसअप: +91-9689900002

 • ई-मेल: feedback [at] punecorporation [dot] org

 • एसएमएस: +91-9689900002

 • कॉल सेंटर: 18001030222

ब) ४५० मिमी व्यास असलेल्या सांडपाण्याच्या नाल्याबाबतच्या तक्रारींचे संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता मल:निस्सारन यांच्यामार्फत निकाली काढण्यात येतात.

क) ६०० मिमी व्यास असलेल्या सांडपाण्याच्या नाल्याबाबतच्या तक्रारींचे कसबा क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता (कारवाई आणि देखभाल) जुने कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय (संपर्क: ०२०-२५५०८४५३) यांच्यामार्फत निकाली काढण्यात येतात.

इमारत परवान्यासाठी सांडपाण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मी कोठून प्राप्त करू शकतो?

परवानाधारक प्लंबर/आर्किटेक्टद्वारे rts.punecorporation.org येथे ऑनलाईन किंवा संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात अर्ज करता येतो.

इमारत परवान्यासाठी सांडपाण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो?

ऑनलाईन अर्ज केल्यापासून पंधरा दिवसांपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र मिळते

इमारत बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्रासाठी सांडपाण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करताना कोणती जोडावी लागतात‍?

 1. परवानाधारक प्लंबरच्या परवान्याची प्रत

 2. मालकीहक्काची कागदपत्रे (पीआरसी/ ७/१२ उतारा)

 3. मिळकत कर ना हरकत

 4. मंजूर आराखड्यासह इमारत परवाना प्रमाणपत्र (चार प्रतीत)

 5. प्रकल्पाच्या आराखड्यासह सांडपाण्यासाठीचा आराखाडा

 6. गृहरचना सोसायटीचे (असल्यास) ना हरकत प्रमाणपत्र

मल:निस्सारन जोडणीसाठी कोठे आणि कसा अर्ज करावा?

नव्या मल:निस्सारन जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत अतिरिक्त शहर अभियंता, मल:निस्सारण विभाग यांच्याकडे परवानाधारक प्लंबरसह ४ क्रमांकाच्या प्रश्नात सांगितलेली कागदपत्रे जोडून अर्ज करावा.

मला मल:निस्सारन जोडणी कशी मिळेल‍?

परवानाधारक प्लंबरच्या कागदपत्रांसह इतर सर्व कागदपत्रे जोडून संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे उप अभियंता (मल:निस्सारन) यांच्याकडे अर्ज केल्यानंतर जोडणी मिळते

मी मल:निस्सारन जोडणीसाठी कोठे अर्ज करावा‍‍?

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत नागरी सुविधा केंद्रात किंवा संबंधित क्षेत्रिय कार्यालयात अर्ज करावा.

मल:निस्सारन जोडणी आणि रस्ते खोदण्याचे दर (सिमेंट, डांबरी रस्ता, बुथ पथ इ.) किती आहेत‍?

 1. जोडणी शुल्क: रु. २२५/-

 2. विकास शुल्क

 1. निवासी उपयोगासाठी: रु. १०००/-

 2. व्यावसायिक उपयोगासाठी: रु. १००००/-

 3. निवासी + व्यावसायिक उपयोगासाठी: रु. ५०००/-

 4. उद्योगासाठीच्या वापरासाठी: रु. २५०००/-

 1. रोड खणण्याचे दर: प्रति मीटर रुपये २६००/- (सिमेंट, डांबरी रस्ता, बुथ पथ इ.)

 2. माती / मुरुम रोड खणण्याचे दर: प्रति मीटर रुपये ७००/-

मल:निस्सारन जोडणीचे शुल्क कोठे भरावे?

संबंधित क्षेत्रिय कार्यालयात चलनाद्वारे शुल्क भरता येते

१०

परवानाधारक प्लंबर्सची माहिती कोठे मिळते?

परवानाधारक प्लंबर्सची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिवाय अतिरिक्त शहर अभियंता, मल:निस्सारन विभाग, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका येथेही यादी उपलब्ध आहे.

११

मल:निस्सारनाची परवानगी किती दिवसात मिळते?

परवानगी ऑनलाईन मिळते. अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांत परवानगी मिळते.

१२

मल:निस्सारण जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे का?

होय

१३

इमारत परिपूर्ती प्रमाणपत्रासाठी मल:निस्सारन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

 1. परवानाधारक प्लंबरची माहिती (परवान्याची प्रत)

 2. मालकीहक्क कागदपत्रे (पीआरसी/ ७/१२ उतारा)

 3. इमारत बांधकाम परवाना आणि परिपूर्ती प्रमाणपत्र

 4. मंजूर आराखड्याच्या चार प्रती

 5. गृहरचना सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र (सोसायटी असल्यास)

 6. मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र

१४

नव्या प्लंबिंग परवान्यासाठी कोठे अर्ज करावा?

पुणे महानगरपालिकेच्य मुख्य इमारतीत अतिरिक्त शहर अभियंता, मल:निस्सारन विभाग यांच्याकडे हस्तलिखित अर्ज सादर करावा.

१५

नव्या प्लंबिंग परवान्यासाठी अर्ज करताना कोणी कागदपत्रे जोडावी लागतात?

खालील कागदपत्रे जोडावी लागतात

 1. शैक्षणिक गुणवत्ता – प्रमाणपत्र

 2. आधार आणि पॅन कार्डची प्रत

 3. दोन रंगीत पासपोर्ट छायाचित्रे

 4. कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र / पत्र

 5. आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र

 6. शाळा सोडल्याचा दाखला

१६

प्लंबिंग परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असते का?

होय, प्रत्येक वर्षी परवान्याचे नूतनीकरण गरजेचे असते.

१७

परवान्याच्या नूतनीकरणासाठी कोठे अर्ज करावा?

पुणे महानगरपालिकेच्य मुख्य इमारतीत अतिरिक्त शहर अभियंता, मल:निस्सारन विभाग यांच्याकडे हस्तलिखित अर्ज सादर करावा.

१८

प्लंबिंग परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे जोडावी लागतात?

खालील कागदपत्रे जोडावी लागतात

 1. शैक्षणिक गुणवत्ता – प्रमाणपत्र

 2. आधार आणि पॅन कार्डची प्रत

 3. दोन रंगीत पासपोर्ट छायाचित्रे

 4. कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र / पत्र

 5. आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र

 6. शाळा सोडल्याचा दाखला

१९

प्लंबिंग परवान्याचे नूतनीकरण कताना आवश्यक शुल्क कोठे जमा करावे?

संबंधित क्षेत्रिय कार्यालयात चलनाद्वारे शुल्क भरता येते

२०

प्लंबिंग परवान्याच्या नूतनीकरण करण्यासाठी किती शुल्क आहे?

रुपये १५००/-

२१

प्लंबिंग परवान्याचे नूतनीकरण करून परवाना मिळण्यासाठी किती कालावधी लागतो?

परवाना ऑनलाईन मिळतो. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत परवाना मिळतो.

जगदीश कानोरे

अधीक्षक अभियंता,

मल:निस्सारन विभाग (ओ अॅण्ड एम)

पुणे महानगरपालिका, पुणे