पाणीपुरवठा विभाग

Select DEPARTMENT PROJECTS

खडकवासला धरण प्रकल्प

खडकवासला धरणामागे जॅकवेल पंप हाऊस उभारणी आणि खडकवासला धरणापासून पर्वती जलकेंद्रापर्यंत पाईपलाईन जोडणी

  • क्षमता: १००० दशलक्ष लिटर
  • क्षेत्र:१३ किलोमीटर
  • सर्वसाधारण अंदाजित खर्च: २३३.८८ कोटी
  • निविदा मूल्य: रुपये २०४.२४ कोटी

या नव्या प्रकल्पाची योजना आणि त्यातून मिळणारे लाभ :

खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पुणे शहराला सतत पाणीपुरवठा करावा लागत असल्याने खडकवासला धरणाचे कालवे दुरुस्त करणे अशक्य आहे. त्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. दरम्यान कालव्याच्या दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती झाल्याने आजूबाजूचे नागरिक कालव्यामध्ये कचर टाकतात, कपडे धुतात. त्यामुळे जलशुद्धीकरणाची खर्च वाढतो. ही समस्या लक्षात घेऊन खडकवासलापासून पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र बंद नळाद्वारे प्रक्रियेसाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी यापूर्वी ३००० मिलिमीटर व्यास असलेली लोखंडाची पाईपलाईन उभारण्यात आली होती. मात्र, शहराची पाण्याची गरज वाढत असल्याने कालव्याद्वारेही पाणी पोहोचविण्याची गरज भासली. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंतच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाईपलाईन उभारली गेली आहे.

कामाचे स्वरुप:

खडकवासला धरणामागे ६० मीटर बाय २३ मीटरच्या पंप हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. तेथे १२५ दशलक्ष लिटरची क्षमता असलेले ८ पंप्स बसविण्यात आले आहेत.हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्यात आला असून त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर कालव्यातून पाणीपुरवठा करताना गळतीमुळे होणार्‍या पाण्याचे एक टीएमसी पाण्याचा अपव्यय वाचणार आहे. शिवाय पाण्याच्या प्रक्रियेसाठी होणारा खर्चही कमी होणार आहे. या प्रकल्पामध्येच पाण्याच्या प्रवाहाचे नोंद घेणारे मीटरही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे २५०० मिलिमीटर व्यासाच्या नळातून सोडण्यात येणार्‍या पाण्याची नोंद ठेवता येणार आहे. याशिवाय १३ किलोमीटर परिसरात असलेल्या या प्रकल्पातील २५०० मिलिमीटर व्यासाचे तीन व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. तर पाईपलाईनच्या आत सिमेंटचा स्तरही देण्यात आला आहे.