कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

कामगार कल्याण निधी

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर २००५ पासून महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण निधी या नावे विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीमध्ये महानगरपालिकेतील वर्ग-१ कर्मचार्‍यांकडून वार्षिक ५०० रुपये, वर्ग-२ कर्मचार्‍यांकडून वार्षिक ४०० रुपये, तर वर्ग-३ कर्मचार्‍यांकडून वार्षिक ३०० रुपये आणि वर्ग-४ कर्मचा्यांकडून वार्षिक २०० रुपये जमा केले जातात. कर्मचार्‍यांकडून जमा झालेल्या रकमेएवी रक्कम महानगरपालिकेच्या निधीतून जमा करण्यात येते. कर्मचार्‍यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी खालील सदस्यांची कार्यकारी समिती तयार करण्यात आली आहे .

मा. आयुक्त अध्यक्ष
मा. अतिरिक्त आयुक्त कार्यकारी अध्यक्ष
मा. मुख्य कामगार अधिकारी सचिव
मा. प्रमुख, लेखा आणि वित्त शाखा कोषागार
वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारे दोन्ही संवर्गातील प्रत्येकी एक अधिकारी सदस्य
वर्ग-३ संवर्गातील अधिकार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारे दोन अधिकारी सदस्य
वर्ग-४ संवर्गातील अधिकार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारे तीन अधिकारी सदस्य
संघटनेचा प्रतिनिधी सदस्य

 

या योजनेमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम :

वारस अनुदान

सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना २२,५००/- रुपयांची मदत करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे :

 • विहित नमुन्यातील अर्ज (निधनानंतर एक वर्षाच्या आत)
 • कर्मचार्‍याचे मृत्यु प्रमाणपत्र
 • कर्मचार्‍याची एप्रिल महिन्याची पगार पत्रक
 • शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत
 • वारसाचे प्रतिज्ञापत्र

शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती :

पात्रताधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी २५,००० रुपयांची शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती देण्यात येते.

नियम व अटी :

 • लाभ घेणारा कर्मचारी हा कामगार कल्याण निधीचा सदस्य असायला हवा.
 • कर्मचार्‍याला दोनपेक्षा अधिक अपत्ये असू नयेत.
 • केवळ उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्यात येते.
 • प्रत्यक्ष शैक्षणिक शुल्क किंवा रुपये २५,००० यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम देण्यात येते.
 • कर्जाची रक्कम कर्मचार्‍याच्या वेतनातून कोणतेही व्याज न घेता २५ समान हप्त्यांद्वारे वसूल करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे :

 • विहित नमुन्यातील अर्ज
 • कर्मचार्‍याचे एप्रिल महिन्याचे पगार पत्रक
 • प्रभागाचे सत्यापण (बोनाफाईड) प्रमाणपत्र
 • कर्मचार्‍याच्या पाल्याची शेवटची गुणपत्रिका
 • पासबुकची सत्यप्रत आणि रद्द केलेले धनादेश

क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम :

आम्ही दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये क्रिडा उपक्रमांचे आयोजन करतो. त्यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लांब उडी, बुद्धीबळ, धावणे, पोहणे आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमामध्ये १५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी होतात.

आवश्यक कागदपत्रे :

 • लेखी अर्ज
 • एप्रिल महिन्याचे पगार पत्रक

दहावी बारावीतील गुणवंतांचा सत्कार :

कामगार कल्याण निधीमार्फत दहावी आणि बारावीच्या इयत्तेत ६५ किंवा त्यापेक्षा अधिक टक्के मिळविणार्‍या कर्मचार्‍यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात येतो. त्यांना सॅक, कॅलक्युलेटर आणि इतर उपयुक्त स्टेशनरी देऊन गौरविण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे :

 • लेखी अर्ज
 • एप्रिल महिन्याचे पगार पत्रक
 • पाल्याची दहावी, बारावीतील गुणपत्रिका

गुणवंत कामगार पुरस्कार :

दरवर्षी कर्मचार्‍यांना (वर्ग-१ आणि २ संवर्गातील प्रत्येकी एक कर्मचारी, वर्ग-३ मधील ३ कर्मचारी आणि वर्ग-४ मधील १३ कर्मचारी) शाल, प्रमाणपत्र आणि २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात येते. महाराष्ट्र सरकारने या पुरस्कारासाठी काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

आवश्यक कागदपत्रे :

 • लेखी अर्ज
 • मार्च महिन्याचे पगार पत्रक

कामगार दिंडी :

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वतीने जून किंवा जुलै महिन्यात कामगार दिंडीचे आयोजन करण्यात येते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आळंदीतून दिंडीला प्रारंभ होतो आणि पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीजवळ दिंडीची सांगता होते. दिंडीदरम्यान सहभागींना अल्पोपहार, जेवण आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. दिंडीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात येतात.