Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील कलम ६६ अंतर्गत असलेल्या कामगार कल्याणासंदर्भातील तरतुदींची अंमलबजावणी करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुणे महानगरपालिकेचे प्रशासन आणि कामगार यांच्यामध्ये बंधूभाव निर्माण करण्यासाठी आम्ही प्रमुख भूमिका बजावतो. आम्ही कामगार कल्याण निधीमार्फत कल्याणकारी योजना, कमागारांचे प्रशिक्षण कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आदी राबविण्यासाठी सातत्याने काम करतो.  आम्ही एखाद्या कामगाराच्या वारसाची नियुक्ती करताना त्यासंदर्भातील  मा. लाड आणि पागे समितीने नियुक्ती संदर्भातील शिफारशीनुसार कायदेशीर बाबी तपासतो. तसेच यासंदर्भातील प्रलंबिक प्रकरणेही मार्गी लावतो आणि कामगार आणि औद्योगिक न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणासंदर्भात समन्वय साधतो. कामगारांच्या तक्रारीचे वेळेत निराकरण करणे आमच्यासाठी महत्वाचे आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या परीने शांततेत काम करतो.

मराठी भाषा संवर्धन हा ही या विभागाचा एक महत्वाचा उपक्रम आहे. या अंतर्गत मराठी भाषेबाबत पुणेकरांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

या विभागातील सर्व सदस्यांना कामगार कल्याण योजनांचे आणि पुणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांसाठी असलेल्या सर्व योजनांचे सर्व प्रकारचे लाभ मिळतात. आम्ही खालील पद्धतीने आमचे ध्येय विस्तारित आहोत - 

 • मनुष्यबळ विकास कक्षाचा विस्तार
 • प्रभावी आणि गरजांवर आधारित प्रशिक्षण गरजांचे पृथ:क्करण करण्याची पडताळणी
 • कामगार कल्याण भवनाची निर्मिती
 • केंद्रीय वेतन कक्षाची निर्मिती
 • महिला कर्मचार्‍यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी योगा, क्रीडा आणि आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील कलम ६६ अंतर्गत असलेल्या कामगार कल्याणासंदर्भातील तरतुदींची अंमलबजावणी करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या विभागाचे काही प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणे -

 • विविध कामगार आणि औद्योगिक कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी
 • कामगारासंदर्भातील प्रकरणात सर्व विभागांना कायदेशीर सल्ला देणे
 • कामगार कल्याण निधीमधील सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे
 • पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांना कामगार शिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे
 • मराठी संवर्धन समितीने ठरविल्याप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे
 • सर्व हमीपत्र, भविष्य निर्वाह निधी, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे, संगणक/वाहन कर्जाला अंतिम मान्यता देणे
 • प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील मतभेदांमध्ये शांततापूर्ण पद्धतीने समन्वय साधण्यासाठी आवश्यक तरतुदी करणे
 • मा. लाड पागे समितीने शिफारशीनुसार विविध विभागांनी पाठविलेल्या अतिरिक्त कामाच्या (ओव्हरटाईम) प्रस्तावांची तपासणी करणे
 • औद्योगिक आणि कामगार न्यायालयात असलेल्या प्रकरणांचा नियमित पाठपुरावा करणे आणि त्यासंदर्भात समन्वय साधणे
 • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे
   

 

image