वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

लाल महाल

शहाजीराजे भोसले यांनी बांधलेल्या लाल महालात शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांचे बराच काळ वास्तव्य होते. याच वास्तूमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती. मुघल बादशहा औरंगजेब याने इ.स. 1660 साली आपला मामा शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांवर चाल करुन जाण्यास सांगितले. शाहिस्तेखानाने त्यानंतरच्या काळात चाकणचा किल्ला ताब्यात घेऊन लाल महालात आपला मुक्काम ठोकला होता.  

भोसले यांनी बांधलेल्या लाल महालात शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांचे बराच काळ वास्तव्य होते. शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात गेले. याच वास्तूमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती. शिवाजी महाराजांच्या अनेक शत्रुंनी महालावर चढविलेल्या हल्ल्यांमुळे आज मूळ महाल अस्तित्वात नाही. पुणे महानगरपालिकेने महालाचे पुन्हा बांधकाम करून ही वास्तू जतन केली आहे.