उदयान विभाग

Select THEME PARKS

स्व. पु.ल. देशपांडे उद्यान

पुणे ओकायामा मैत्री गार्डन अर्थात  पु.ल. देशपांडे उद्यान हे भारत आणि जपान या दोन  देशांमधील पुणे आणि ओकायामा या प्रमुख शहरांमधील  मैत्रीचे प्रतीक आहे

हे आशियातील जपानी पद्धतीने तयार केलेले सर्वात मोठे उदयान आहे. जपानमधील प्रसिद्ध ओकायामा कोरोक्वेन उद्यानाच्या धर्तीवर पु.ल.देशपांडे उद्यानाची रचना करण्यात आली आहे.  सुमारे दहा एकरात वसलेल्या उद्यानात जपानी उद्यान संस्कृती आणि विचारधारा दिसून येते. उद्यानातील मोठाले लॉन्स, तलाव, कृत्रिम टेकड्या, जंगल आणि प्रवाही पाण्याच्या खळखळ आवाजामुळे पर्यटकांचे मन प्रसन्न होते.  

 

प्रवेश शुल्क

  • प्रौढ- प्रत्येकी ५ रुपये
  • बालके- प्रत्येकी ५ रुपये

उद्यानाच्या वेळा

  • स. ६ ते १०.००
  • सायं ४.०० ते ७.३०

    पत्ता- सिंहगड रोड

    Google Map

    •