उदयान विभाग

Select THEME PARKS

स्व. यशवंतराव चव्हाण उद्यान

थीम- जगातील सात प्रमुख आश्चर्ये

जगभरातील सात प्रमुख आश्चर्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. उद्यानात या सात आश्चर्यांची धातू /फायबरपासून तयार केलेली सूक्ष्मरचना मांडण्यात आली आहे. रचनाकार नितीन देसाई आणि पुण्यातील आर्कीटेक्ट महेश नामपुरकर यांनी ही सूक्ष्मरचना तयार केली आहे.

उद्यानातील आकर्षणस्थळे

- जगातील सात आश्चर्यांच्या सूक्ष्मरचना

- फोर डी थिएटर

या 4डी थिएटरला दादासाहेब फाळके यांचे नाव देण्यात आले आहे. प्रेक्षकांना येथे संध्याकाळी काऊंट ड्रॅक्यूला, अलाद्दीन आणि अलिबाबाच्या गोष्टी सांगणारे कार्यक्रम दाखविले जातात. कार्यक्रमांदरम्यान गोष्टींची वातावरणनिर्मिती करुन त्यात आणखी जिवंतपणा आणण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

प्रवेश शुल्क

उद्यानात प्रवेश मोफत आहे. ४डी थिएटरसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते.

उद्यानाच्या वेळा : 

 

  • स. ६.०० ते १०.०० 
  • सायं ४.०० ते ८.३०

पत्ता – सहकारनगर, पुणे

Google Map