OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

गळतीचा शोध

पाण्याच्या पंपिंगसाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. पाण्यावरील प्रक्रियेसाठी रसायने लागतात. या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असते. त्यामुळे जर पाण्याची गळती झाली तर आपल्याला अधिक किंमत मोजावी लागते आणि य मौल्यवान नैसर्गिक स्रोताचा र्‍व्हासही होतो. भारतीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बर्‍याचदा समोर दिसणारी आणि छोट्या छोट्या पाण्याच्या गळतीवर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सर्वात आधी डोळ्यांना दिसणारी गळती बंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर छोट्या-छोट्या गळतीचा शोध घेणे आवश्यक आहे.

नळाद्वारे पाण्याच्या प्रवाहामध्ये होणारी पाण्याची गळती शोधण्यासाठी विविध पद्धती अवलंबिल्या जातात. गळीत होणार्‍या ठिकाणी होणार्‍या आवाजाच्या आधारे गळतीच्या ठिकाणांचा यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेद्वारे शोध घेण्यात येतो. तसेच ज्या ठिकाणी पाण्याची गळती होताना आवाज होत नाही अशा ठिकाणी `इनर्ट गॅस’ पद्धतीचा अवलंब केला जातो. गळती होणार्‍या ठिकाणांचा एकदा शोध लागला की अशा ठिकाणी दुरुस्ती करण्यात येते. गळतीच्या प्रमाणानुसार गळतीचा प्रकार निश्चित केला जातो आणि त्याप्रमाणे दुरुस्ती केली जाते.