स्थानिक संस्था कर ऑनलाईन नोंदणी पद्धती

स्थानिक संस्था कर  ऑनलाईन नोंदणी पद्धती

कोणतीही संस्था / कंपनी ज्यांना पुणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात व्हॅट नोंदणी क्रमांक आहे त्यांना व्यवसाय स्थानिक संस्था करांतर्गत त्यांचा व्यवसाय नोंदविण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागते:

 • पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org  या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर ऑनलाईन सेवा या विभागातून ‘LBT Online Registration ’ वर क्लिक करा. त्यानंतर एलबीटीच्या सेवांसाठीचे एक नवे वेबपेज समोर दिसेल. त्यामधून VAT HOLDERS REGISTRATION वर क्लिक करा. 
 • आता समोर दिसणार्‍या स्क्रिनवर व्हॅट नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल नोंदवा. त्यानंतर तुम्ही नोंदविलेल्या क्रमांकावर एक एकवेळा वापरता येणारा पासवर्ड (ओटीपी) प्राप्त होईल. तो ओटीपीच्या नोंदवा आणि Verify वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या एलबीटी प्रमाणपत्रावर असणारे तुमचे नाव स्क्रिनवर नोंदवा आणि Save वर क्लिक करा. व्हॅटधारकांना १०० रुपये नोंदणी फी भरण्याची गरज नाही.
 • त्यानंतर तुम्हाला एलबीटी क्रमांक आणि नोंदणी प्रमाणपत्र दिसेल. तुमचा व्हॅट क्रमांक हा तुमचा युजर आयडी असेल तर ओटीपी हा तुमचा पासवर्ड असेल. पहिल्यांदा लॉगीन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड बदलता येईल.
 • जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही ही ऑनलाईन प्रक्रिया पार पाडू शकला नाहीत तर जवळच्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात जाऊन तेथील ऑपरेटरला ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगू शकता.
 • एकदा का तुमची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली की तुम्ही एलबीटीसंदर्भातील सर्व प्रक्रिया युजर आयडी आणि पासवर्डद्वारे सहजपणे पार पाडू शकाल.

कोणतीही संस्था / कंपनी ज्यांना पुणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात व्हॅट नोंदणी क्रमांक नाही त्यांना स्थानिक संस्था करांतर्गत त्यांचा व्यवसाय नोंदविण्यासाठी खालील प्रक्रिया करावी:

 • पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org  या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर ऑनलाईन सेवा या विभागातून ‘LBT Online Registration ’ वर क्लिक करा. त्यानंतर एलबीटीच्या सेवांसाठीचे एक नवे वेबपेज समोर दिसेल. त्यामधून VAT registered outside PMC’ वर क्लिक करा. 
 • समोर दिसणार्‍या पेजवर ` Register New User’ वर क्लिक करावे. तेथे एलबीटी प्रमाणपत्रावर असलेले नाव, व्यवसायाचे नाव, ई-मेल आयही, मोबाईल क्रमांक नोंदवा आणि Save वर क्लिक करा.
 • त्यानंतर अर्जदाराने नोंदविलेल्या ई-मेलवर आयडीवर त्याला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल. ही माहिती वापरून लॉगिन करा. पहिल्यांदा लॉगिन केल्यानंतर पासवर्ड बदलता येईल. व्हॅटधारकांना १०० रुपये नोंदणी शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
 • पुन्हा युजर आयडी आणि बदललेला पासवर्ड वापरून लॉगिन करा. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन्ड कॉपीज, अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आदी माहिती वापरून अर्ज भरा.
 • अर्ज भरल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि प्रमाणपत्र दिसेल. 
 • एकदा का तुमची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली की तुम्ही एलबीटीसंदर्भातील सर्व प्रक्रिया युजर आयडी आणि पासवर्डद्वारे सहजपणे पार पाडू शकाल.

स्थानिक संस्था करांतर्गत आपल्या व्यवसायाची तात्पुरती नोंदणी करु इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था/कंपनीने खालील प्रक्रियेचा अवलंब करावा 

 • पुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org या संकेतस्थळाला भेट द्या आणि ‘एलबीटी ऑनलाईन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, http://pmc.mahalbt.com/ लिंक असणारे नवे पेज उघडेल. तेथे ‘तात्पुरती नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
 • नव्या पेजवर ‘वापरकर्त्यासाठी तात्पुरती नोंदणी’अंतर्गत अर्जदाराचे एलबीटी नोंदणी प्रमाणपत्रावर अपेक्षित असलेले नाव भरावे. याशिवाय, व्यवसायाचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, व्हॅट नोंदणी क्रमांकाचीदेखील नोंद करावी. त्यानंतर ‘सेव्ह’ पर्याय निवडावा.
 • अर्जदाराला नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. हा युझर आयडी आणि पासवर्ड वापरुन एलबीटीच्या संकेतस्थळावर लॉगिन करा. पहिल्या लॉगिननंतर पासवर्ड बदलण्यात यावा. पुर्वी जर तुम्ही व्हॅट क्रमांक दिला नसेल तर १०० रुपयांचे चलन तयार केले जाईल. जर तुम्ही आधीच व्हॅट क्रमांक सादर केला असेल तर तुम्हाला थेट नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. 
 • व्हॅट क्रमांक नसणाऱ्या अर्जदारांना १०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. हे शुल्क पुणे महानगरपालिका प्रभाग कार्यालयातील स्थानिक संस्था कर कार्यालय, नोंदणीकृत बँकांच्या शाखांमध्ये रोख किंवा डीडीद्वारे किंवा ऑनलाईन पेमेंटद्वारे भरता येईल. रोख किंवा डीडीद्वारे रोख शुल्क भरावयाचे असल्यास अर्ज भरुन झाल्यावर मिळालेले चलन सोबत आणावे. चलनाच्या खालील बाजूस कोणाच्या नावे हे शुल्क भरावयाचे आहे ते नाव देण्यात येते. 
 • व्हॅट क्रमांक नसणाऱ्या अर्जदारांनी शुल्क भरल्यानंतर त्यांना नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.  
 • नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुम्ही तोच युझर आयडी आणि पासवर्ड वापरुन एलबीटीशी निगडीत सर्व व्यवहार ऑनलाईन पार पाडू शकता.