अग्निशामक विभाग

Select FIRE SAFETY

एलपीजी सुरक्षा

अग्नि= इंधन +उष्णता + ऑक्सिजन

ज्वलन प्रक्रियेत खालील घटकांचा सहभाग असतो

तिन्ही घटक एकत्र आल्यानंतर अग्नी पेट घेतो. तिन्हीपैकी एक घटक नाहीसा केला तर अग्नीला प्रतिबंध करता येऊ शकतो.

 1. ज्वलनशील पदार्थ किंवा इंधन
 2. हवा किंवा इतर पद्धतीने मिळणारा ऑक्सिजन
 3. या दोन्ही पदार्थांच्या मिश्रणाला ठराविक तापमान प्राप्त झाल्यानंतर अग्नी निर्माण होतो.

एलपीजी सुरक्षा टिप्स :

 • वेळोवेळी रबर ट्युबची तपासणी करा. त्यात त्रुटी आढळल्यास रबर ट्युब बदलून घ्या
 • आधी काडी पेटवा आणि स्टोव्हचे नॉब सुरु करा
 • गॅस गळती होत असल्यास - घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे सुरु करु नका ,काडेपेटी, लाईटर, स्टोव्ह पेटवू नका
 • सिलेंडर घेण्यापूर्वी त्यातून गॅस गळती होत नाही याची खात्री करुन घ्या. सिलेंडर नेहमी उभे ठेवा.
 • सिलेंडरमध्ये लीकेज आढळून आल्यास सर्वात आधी त्याला सेफ्टी कॅप लावा. सेफ्टी कॅप नसल्यास तेथे साबण लावून सिलेंडर मोकळ्या जागेत ठेवा व वितरकाशी त्वरित संपर्क साधा.

आग लागल्यास :

 • घाबरु नका
 • इकडे तिकडे पळू नका
 • शौचालयात आश्रय घेऊ नका
 • अग्निशमन दलाशी संपर्क साधा
 • बाहेर पडताना तुमच्यामागील दरवाजे बंद करा
 • टेरेसवर जाण्याऐवजी तळमजल्यावर जाण्याचा प्रयत्न करा
 • बाहेर पडण्यासाठी लिफ्ट वापरु नका
 • शक्य असल्यास आग विझवण्यासाठीच्या यंत्राचा वापर करा
 • तुम्हाला माहीत असेल तर या उपकरणांबाबत अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना माहिती द्या

अग्निशमन दलाशी कसा संपर्क साधाल :

 • कंट्रोल रुममधील अधिकारी तुमचा फोन उचलतो
 • त्याला तुमचा पत्ता, घटनेचा तपशील आणि दूरध्वनी क्रमांक द्या
 • फोन ठेऊन कंट्रोल रुममधून पुन्हा फोन येण्याची वाट पहा
 • अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहा, त्यांना सहकार्य करा