अग्निशामक विभाग

Select FIRE SAFETY

संकटकालीन बचाव प्रशिक्षण (Mock Drill)

मॉक ड्रिलस्

सरकारी/निमसरकारी संस्था, शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स आणि औद्योगिक क्षेत्रांमार्फत अग्निसुरक्षेसंदर्भातील कार्यशाळांचे(मॉक ड्रिल्स) आयोजन केले जाते. अग्निशमन केंद्राकडून यावेळी सहभागी झालेल्यांना अग्निशमक उपकरणे कशी वापरावीत तसेच आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर काय काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते.

मॉक ड्रिलदरम्यान खालील गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते:

 1. आग लागल्यानंतर करण्यात येणार्या उपाययोजना
 2. आग विझवण्याची प्रक्रिया सुरु असताना केले जाणारे प्रतिबंधात्मक उपाय
 3. पेटलेल्या इमारतीतून बाहेर पडणे
 4. पीडितांना मदत करणे
 5. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माती, चिखल, पाणी आणि ओल्या कपड्यांचा वापर

यावेळी सहभागींना आगीपासून स्वतःचा बचाव करणे, नजीकच्या दवाखान्यात संपर्क साधणे आणि औषधोपचार मिळविणे, अग्निशमन उपकरणांचा अचूक वापर करणे यासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. नागरिकांचा या कार्यशाळांना समाधानकारक प्रतिसाद असतो. मॉक ड्रिल संपल्यानंतर नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाते.

‘फायर ड्रिल’ आणि आगीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:

आग लागल्याचे आढळून आल्यास-

 • जवळच्या ‘पुश बटण’भोवतालची काच फोडून ते बटण दाबा
 • मजल्यावरील अग्निरोधक उपकरणांचा वापर करा. यासाठी तुमच्या इमारतीमधील वॉर्डनची मदत घ्या
 • वॉर्डनने सूचना दिल्यास मजला लगेचच रिकामा करा

जागा रिकामी करण्याची सूचना मिळाल्यास-

 • उत्तर किंवा दक्षिण दिशेच्या जिन्याने उतरुन मजला त्वरित रिकामा करा
 • लिफ्टचा वापर टाळा
 • स्टोअररुम मध्ये जाऊ नका
 • आरडाओरडा किंवा इकडे तिकडे पळू नका
 • स्वतःच्या वस्तू गोळा करु नका
 • लिफ्ट लॉबी आणि जिन्याचे दार बंद करा

संकटकाळी एकत्र येण्याचे ठिकाण -

E-1 - प्राथमिक माहिती

बहुमजली इमारतीला आग लागल्यास रहिवाशांना सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यासाठी शिस्तबद्ध आणि पध्दतशीर योजना तसेच प्रशिक्षण आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नागरिकांना मदत करण्याचा हेतू आहे.

E-2 - अलार्म

एखाद्या व्यक्तीला इमारतीमध्ये आग, उष्णता किंवा धूर आढळून आल्यास त्वरित अग्निशमन केंद्राला माहिती द्यावी. तोंडी किंवा लिखित स्वरुपातील कोणताही आदेश एखाद्या व्यक्तीला अग्निशमन केंद्राशी संपर्क साधण्यापासून रोखू शकत नाही.

E-3 - प्रात्याक्षिके

 • E-3.1 – अग्निसुरक्षा आराखड्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींमध्ये पहिल्या दोन वर्षांमध्ये किमान दर तीन महिन्यातून एकदा आणि त्यानंतर सहा महिन्यातून एकदा ‘फायर ड्रिल’चे आयोजन व्हायला हवे.
 • E-3.2 – इमारतीत राहणार्या सर्व रहिवाशांनी ड्रीलमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. इमारतीला सेवा देणार्या कर्मचार्यांव्यतिरिक्त इतर सर्व रहिवाशांनी मजला सोडून जाण्याची किंवा ‘एक्झिट’चा वापर करण्याची गरज नाही.
 • E-3.3 – या सर्व ड्रील्सचा लेखी तपशील इमारतीच्या परिसरात उपलब्ध असणे गरजेचे आहे. अग्निशमन विभागाकडून याची कधीही तपासणी केली जाऊ शकते.

E-4 - चिन्हे आणि योजना

 • E-4.1 – लिफ्टजवळील चिन्हे

प्रत्येक मजल्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी चिन्हे आणि सूचनाफलक लावलेले असावेत. आग लागल्यास रहिवाशांनी जिन्याचा वापर करावा अशा स्वरुपाची सूचना, तसेच जिन्याचे स्थान दाखविणारा फलक चित्रासह असावा. रहिवाशाला वाचता येईल अशा ठिकाणी ठळक स्वरुपात या सूचनाफलकांची जागा असावी.

 • E-4.2 – मजल्याची माहिती

प्रत्येक मजल्यावर जिन्यापाशी मजल्याचा आकडा ठळक स्वरुपात लिहिलेला असावा.

 • E-4.3 – जिना आणि लिफ्टची ओळख पटवून देण्यासाठी चिन्हे

प्रत्येक जिना आणि प्रत्येक लिफ्टच्या मागच्या बाजूला चिन्ह असणे गरजेचे आहे. लिफ्टजवळ आणि जिन्यापासून बाहेर जाण्याच्या मार्गावर हे चिन्ह असावे.

 • E-4.4 – जिन्यावरील पुनर्प्रवेशाची चिन्हे

प्रत्येक मजल्यावर जाणार्या प्रत्येक पायरीवर तसेच आवश्यक त्या ठिकाणी किंवा जिन्याच्या भिंतीवर ठळक अक्षरात चिन्हे लावावीत. अशा चिन्हांवरील अक्षरे आणि आकडे ठळक अक्षरात असावीत. ही चिन्हे किमान १२.५ मिलीमीटर उंचीची आणि तळापासून दीड मीटर उंच लावलेली असावीत.

 • E-4.5 – इमारतीत एक ‘फायर कमांड स्टेशन’ तसेच सेवा उपकरणाबाबत इतर उपयुक्त माहिती उपलब्ध असावी.

E-5 - अग्निसुरक्षा आराखडा

 • E-5.1 – इमारत व्यवस्थापनाने सर्व रहिवाशांना अग्निसुरक्षा विभागाने मंजुर केलेला अग्निसुरक्षा आराखडा उपलब्ध करुन द्यायला हवा.
 • E-5.2 – त्यानंतर सर्व रहिवाशी आणि इमारत व्यवस्थापनाने आपल्याकडील कर्मचार्यांना याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे.
 • E-5.3 – इमारतीचा मालक जर या इमारतीचा रहिवासील असेल तर त्यानेदेखील इतरांप्रमाणे या अग्निसुरक्षा आराखड्याचे पालन करणे बंधनकारक आहे.
 • E-5.4 – अग्निसुरक्षा आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर जर इमारतीत काही बदल झाले असतील आणि आराखड्यात ते नमूद करण्याचीआवश्यकता असेल तर बदल करुन पुढील तीस दिवसांच्या आत नवा आराखडा अग्निशमन केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जावा.

E-6 - फायर कमांड स्टेशन

फायर कमांड स्टेशन हे इमारतीत प्रवेश केल्यानंतर असणार्या लॉबीमध्ये असावे. कमांड स्टेशनमध्ये पुरेसा प्रकाश असावा.

E-7 - कम्युनिकेशन्स आणि फायर अलार्म

आणीबाणीच्या काळात उपयुक्त ठरणारा अलार्म उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी इमारतीचा मालक किंवा संबंधित प्रभारी(इन-चार्ज) व्यक्तीची आहे.

E-8 अग्निसुरक्षा योजना आराखडा

 • E-8.1 –इमारतीचा पत्ता, रस्ता आणि पिनकोड क्रमांक, दूरध्वनी
 • E-8.2 – उद्देश आणि उद्दीष्टे
  • E-8.2.1 – उद्देश - इमारत किंवा आजूबाजूच्या परिसरात आग किंवा इतर आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुव्यवस्थित आराखडा तयार करणे, त्यासाठी आवश्यक उपकरणांचा वापर करणे.
  • E-8.2.2 – उद्दिष्टे- सर्व रहिवाशांना अशा परिस्थितीत नेमके कसे वागावे याचे प्रशिक्षण देणे
 • E-8.3 – अग्निसुरक्षा संचालक
  • नाव
  • नियमित नियुक्ती- (पद)
  • नियुक्तीचे ठिकाण
  • नेहमी त्यांना कशी माहिती दिली जाते?
  • नेहमीच्या जागेवर नसताना कशी माहिती दिली जाते?
  • कामाचे रोजचे तास
  • अग्निसुरक्षा संचालकाची कर्तव्ये (E-9.1 पाहा )
 • E-8.4 – अग्निसुरक्षा उपसंचालक
  • नाव
  • नियमित नियुक्ती- (पद)
  • नियुक्तीचे ठिकाण
  • नेहमी त्यांना कशी माहिती दिली जाते?
  • नेहमीच्या जागेवर नसताना कशी माहिती दिली जाते?
  • कामाचे रोजचे तास
  • अग्निसुरक्षा उपसंचालक कर्तव्ये (E-9 पाहा )
 • E-8.5 – अग्निशमन वॉर्डन्सची आणि उपवॉर्डन्स
  • प्रत्येक मजल्यावर संस्थेच्या तक्त्यामध्ये त्यांची नावे आहेत का?
  • फायर ड्रिल आणि बाहेर पडण्यासंदर्भातील तक्ता सादर करणे
  • अग्निशमन वॉर्डन्सची आणि उपवॉर्डन्सची कर्तव्ये (E-9.3 पाहा)
 • E-8.6 – इमारत निर्वासन पर्यवेक्षक
  • नाव
  • नियमित नियुक्ती- (पद)
  • नियुक्तीचे ठिकाण
  • नेहमी त्यांना कशी माहिती दिली जाते?
  • नेहमीच्या जागेवर नसताना कशी माहिती दिली जाते?
  • कामाचे रोजचे तास
  • इमारत निर्वासन पर्यवेक्षकाची कर्तव्ये (E-9.4 पाहा )
 • E-8.7 – फायर पार्टी
  • फायर पार्टीबाबतचा संपुर्ण तक्ता सादर करणे आवश्यक आहे, सोबत प्रभारी व्यक्ती आणि त्याचे पद इत्यादी बाबी नमूद करणे आवश्यक
  • त्यांच्या निवडीचा निकष नमूद करणे
  • त्यांना मिळणारी सूचना व प्रतिसादाविषयी माहिती
  • प्रत्येकाच्या कामाचे तास (E-9.5 पाहा)
 • E-8.8 – रहिवाशांसाठी सूचना
 • सर्व रहिवाशी, भाडेकरु, त्यांचे कर्मचारी आणि इमारत कर्मचार्यांना सूचना (see E-9.6)
 • E-8.9 – इव्हॅक्युएशन ड्रिल
  • ड्रिलची वारंवारिता
  • कशाप्रकारे आयोजन ?
  • कोणाचा सहभाग ?
  • नियंत्रण आणि पर्यवेक्षण ?
  • ड्रिलचा तपशील ?
 • E-8.10 – फायर कमांड स्टेशन
  • ठिकाण
  • आवश्यकता
   • पुरेसा प्रकाश
   • प्रत्येक मजल्यावरील यांत्रिक उपकरण खोली आणि लिफ्ट नियंत्रण कक्षाशी पुरेसा संपर्क
   • अग्निसुरक्षा योजना आराखड्याची प्रत
   • इमारतीची माहिती देणार
   • इमारत माहिती फॉर्मची प्रत
 • E-8.11 – चिन्हे
  • लिफ्टपाशी चिन्हे, आकृत्या
  • मजला क्रमांक
  • पायर्यांची ओळख
  • लिफ्टची ओळख
  • जिना पुनर्प्रवेशाबाबत
 • E-8.12 – अग्नि प्रतिबंध आणि अग्निसुरक्षा प्रोग्रामर ( E-9.7 पाहा)
 • E-8.13 –इमारत माहिती फॉर्म (E-9.8 पाहा)
 • E-8.14 –मजल्याचा आराखडा (E-9.9 पाहा)
 • E-8.15 –अग्निसुरक्षा योजना आराखडा (E-9.10 पाहा)

E-9 कर्तव्ये

 • E-9.1 – अग्निसुरक्षा संचालकाची कर्तव्ये
 • E-9.1.1 –फायर ड्रिल आणि आणीबाणीच्या काळाबाबत मार्गदर्शन करणार्या अग्निसुरक्षा योजना आराखड्याचा संपुर्ण माहिती ठेवणे
 • E-9.1.2 –फायर पार्टीसाठी योग्य कर्मचार्यांची निवड, प्रशिक्षण आणि त्यांचे पर्यवेक्षण
 • E-9.1.3 – प्रात्याक्षिकांचे आयोजन
 • E-9.1.4 – फायर वॉर्डन्सची, उपवॉर्डन्सची नेमणूक आणि प्रशिक्षणाची जबाबदारी

टीप– एकावेळी अनेक फायर वॉर्डन आणि उपवॉर्डनशी संपर्क शक्य नसल्यास, फायर वॉर्डनच्या अनुपस्थितीत दुसर्या वॉर्डन किंवा उपवॉर्डनची नेमणूक करता येईल. अग्निसुरक्षा संचालकाला पर्यायी व्यवस्थेबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

 • E-9.1.7 –अग्निसुरक्षा आराखड्यातील नियमांचा भंग होत असल्यास इमारतीचा मालक किंवा संबंधित प्रभारी व्यक्तीच्या निदर्शनास आणून देणे. मालक/प्रभारी व्यक्तीने सांगूनदेखील नियमांचे पालन झाले नाही तर अग्निसुरक्षा विभागाला याबाबत माहिती देणे
 • E-9.1.8 – आगसदृश परिस्थिती उद्भवल्यास फायर कमांड स्टेशनला माहिती देणे व त्यांच्यासोबत सहकार्य करणे :
 • E-9.1.9 – इमारत इव्हॅक्युएशन पर्यवेक्षकाच्या प्रशिक्षण आणि अॅक्टिव्हिटीजची जबाबदारी घेणे
 • E-9.2 – अग्निसुरक्षा उपसंचालकाची कर्तव्ये
  • E-9.2.1 अग्निसुरक्षा संचालकाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे
  • E-9.2.2 अग्निसुरक्षा संचालकाच्या अनुपस्थितीत त्याची कर्तव्ये पार पाडणे
 • E-9.3 – फायर वॉर्डन आणि उपवॉर्डनची कर्तव्ये
  • E-9.3.1 –आग लागल्यानंतर रहिवाशांना सहीसलामत बाहेर काढण्याची जबाबदारी फायर वॉर्डनची आहे. प्रत्येक मजल्यासाठी एका वॉर्डनची नियुक्ती आवश्यक असून एक उपवॉर्डनने फायर वॉर्डनला मदत करणे आवश्यक आहे.
  • E-9.3.2 प्रत्येक वॉर्डन आणि उपवॉर्डनला अग्निसुरक्षा योजना आराखडा , अलार्मची आणि बाहेर पडण्याचा रस्ता इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.
  • E-9.3.3 – आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यानंतर किंवा त्याबाबत सूचना मिळाल्यानंतर फायर वॉर्डनला आगीचे ठिकाण आणि रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी करता येऊ शकणार्या त्वरित उपाययोजना ओळखता आल्या पाहिजेत
  • E-9.3.4 – फायर ड्रिल आणि इव्हॅक्युएशन असाईनमेंटसाठी संस्थेचा तक्ता
  • E-9.3.5 – इमारतीमध्ये राहणार्या ज्या व्यक्ती जिन्याचा वापर करु शकत नाहीत अशा दिव्यांग व्यक्तींची यादी ठेवणे. आणीबाणीच्या प्रसंगात अशा व्यक्तींच्या सूटकेची तरतीद करणे
  • E-9.3.6 – फायर वॉर्डनची ओळख पटविण्याबाबतची माहिती देणे
  • E-9.3.7 – सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे याची खात्री करुन घेणे
  • E-9.3.8 – अलार्म ऐकू आल्यानंतर बचावकार्यासाठी सज्ज होणे
 • E-9.4 – बिल्डिंग इव्हॅक्युएशन पर्यवेक्षकाची कर्तव्ये
  • बिल्डिंग इव्हॅक्युएशन पर्यवेक्षकाला अग्निसुरक्षा संचालकाच्या अनुपस्थितीत अग्निसुरक्षा योजना आराखड्यानुसार बचावकार्यासंबंधीचे मार्गदर्शन करता आले पाहीजे
  • आगसदृश परिस्थिती उद्भवल्यानंतर फायर कमांड हातात घेऊन बचावकार्यास प्रारंभ करणे ही बिल्डींग इव्हॅक्युएशन पर्यवेक्षकाची प्रमुख जबाबदारी आहे
 • E-9.5 – फायर पार्टीची कर्तव्ये
  • फायर कमांड स्टेशनला आगीसंबंधांत माहिती देणे आणि बचावकार्यात मदत करणे
  • आग लागलेल्या मजल्यावरुन रहिवाशांना बाहेर काढल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणे
  • आगीचे प्रमाण कमी असल्यास अग्निसुरक्षा विभागाच्या दलाचे आगमन होईपर्यंत आगीवर नियंत्रण राखणे
  • फायर पार्टीच्या एका सदस्याने खालच्या मजल्यावर थांबून अग्निसुरक्षा विभागाला संबंधित माहिती देण्यासाठी हजर असावे
  • अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर फायर पार्टीच्या सदस्याने फायर कमांड स्टेशनला सहकार्य करावे
  • आगीसंदर्भातील सूचना मिळाल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाला संपर्क साधता येईल अशा ठिकाणाची माहिती असणार्या सदस्याची नेमणूक करणे व त्याला गरजेप्रमाणे सूचना देणे
 • E-9.6 –रहिवाशांसाठी सूचना
  • अग्निसुरक्षा योजना आराखड्यानुसार बचावकार्याची अंमलबजावणीत सहकार्य आणि सहभाग दर्शविणे
 • E-9.7 –अग्निशामक आणि अग्निसुरक्षा कार्यक्रम.
  • ठराविक कालावधीनंतर प्रत्येक मजला, बाहेर पडण्याची दारे, अग्निशमन उपकरणे आणि संबंधित उपकरणांची तपासणी झाली पाहिजे.
 • E-9.8 – इमारत माहिती फॉर्म
  • या फॉर्ममध्ये इमारतीचा पत्ता, मालक, अग्निसुरक्षा संचालक आणि उपसंचालक तसेच इमारतीसंबंधी माहिती, बचावकार्यासाठी वापरली जाणारी आवश्यक उपकरणे इत्यादीसंदर्भात सखोल माहिती सादर करणे आवश्यक आहे
  • E-9.9 - प्रातिनिधिक फ्लोअर प्लॅन
   • इमारतीबाबत प्राथमिक माहिती देणारा दस्तावेज मुख्य लॉबीमधील कमांड पोस्टमध्ये उपलब्ध असावा. त्याची एक प्रत अग्निसुरक्षा विभागाकडे सादर केलेली असावी.
 • E-9.10 – अग्निसुरक्षा योजना
  • अग्निसुरक्षा आराखडा तयार करताना इमारतीची रचना, लोकसंख्या, बाहेर पडण्याचे मार्ग, रहदारीचा मार्ग, उपलब्ध जागा आणि रहिवाशांनुसार विभागवारी इत्यादी बाबींचे परीक्षण करणे आवश्यक आहे. आग पेटल्यानंतर बाहेर पडण्यासाठी कोणता रस्ता योग्य राहील ही बाबदेखील लक्षात घेणेदेखील गरजेचे आहे
 • E-9.11 – पर्सनल फायर इन्स्ट्रक्शन कार्ड- या कार्डामध्ये रहिवाशांसाठी फ्लोअर प्लॅन आणि बाहेर पडण्याची माहिती तसेच सूचना दिलेल्या असतात.

तुमच्या वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात गरजेची माहिती

 • प्रत्येक मजल्यावर दोन अलार्म उपलब्ध असतात. ते कसे वापरायचे याची माहितीदेखील दिलेली असते.
 • त्याचप्रमाणे आग विझविण्यासाठी वापरण्यात येणार्या उपकरणावरील सूचना वाचा
 • तुमच्या टेबलपासून सर्वात जवळचा बाहेर पडण्याचा मार्ग शोधा
 • आग पेटल्यानंतर तुम्ही तळमजल्यावर जमावे(यासंदर्भाती माहिती फायर वॉर्डन किंवा उपवॉर्डनकडून मिळू शकते)
 • तुमच्या सुरक्षेसाठी फायर वॉर्डन किंवा फायर उपवॉर्डनशी संपर्क साधा
  • एखाद्या मार्गावर बेवारस वस्तू आढळल्यास
  • जिन्याचे किंवा लिफ्टचे दार आपोआप बंद होत नाही किंवा पुर्ण बंद होत नसेल तेव्हा
  • फायर अलार्मचे एखादे बटण खराब झाले किंवा तुटल्याचे आढळून आल्यास