- औंध आणि बालेवाडीला जोडणारा 1.6 किलोमीटरचा नवा रस्ता तयार करण्यात आला. बालेवाडीतील रहिवाशांना नवा रस्ता आणि मिळाला आणि बाणेर रस्त्याला नवा समांतर रस्ता तयार झाला. या प्रकल्पासाठी ४ कोटी रुपयांचा खर्च आला.
- बाणेर एसटीपीसमोर एक मोठा पूल बांधण्यात आला, यासाठी 7 कोटी रुपयांचा खर्च आला.
- कॅनल रोड- सिंहगड रोडला पर्यायी रस्ता, प्रकल्पाचा खर्च १२ कोटी रुपये
- मगरपट्टा सिटीसमोरील एक किलोमीटर लांब मगरपट्टा रस्त्याचे रुंदीकरण, प्रकल्पाचा खर्च २ कोटी रुपये
- मगरपट्टा आणि हडपसरच्या सीमेवर नव्या डीपी रोडचे बांधकाम, यामुळे मुंडवा बायपासला पर्यायी रस्ता उपलब्ध, प्रकल्पाचा खर्च २ कोटी रुपये
- मुंडवा घोरपडी, केशवनगर येथील नव्या डीपी रोडचा विकास, प्रकल्पाचा खर्च दीड कोटी रुपये
- मालधक्का ते पुणे स्टेशनजवळील पुणे एसटी स्टॅंडपर्यंत रस्त्याचा विकास, प्रकल्पाचा खर्च 2.2 कोटी रुपये
- बोट क्लब रोडवरील पथपदांचा विकास, प्रकल्पाचा खर्च ८० लाख रुपये
- कोरेगाव पार्क लेन नं ७ चा टीडब्लूटी तत्त्वावर विकास, प्रकल्पाचा खर्च १.९ कोटी रुपये