समाज विकास विभाग

Select WOMEN AND CHILD WELFARE LAWS

रात्र निवारा प्रकल्प

मा.सर्वोच्च न्यायालय, रिट पिटीशन क्र. १९६/२००१ चे निर्देशानुसार व मा. महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार पाच लाखा पेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येस एक या प्रमाणे रात्र निवारा (नाईट शेल्टर) प्रकल्प उभारण्यात यावे असा निर्णय देण्यात आलेला आहे. पुणे शहराची लोकसंख्या ३८ लाख गृहीत धरून शासनाने पुणे शहरामध्ये नाईट शेल्टर प्रकल्प राबविण्याबाबतचे कळविलेले आहे. या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेश व मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील बेघर व निराश्रित लोकांसाठी निवा-याची सोय नाईट शेल्टर प्रकल्पाद्वारे करणे कामी पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुणे शहरात ​रात्र निवारा प्रकल्प राबविणेत येत आहे. ​ 

सध्या पुणे शहरात 3 ठिकाणी रात्र निवारा प्रकल्प खालील संस्थांच्या सहकार्याने सुरू आहेत.

अ. क्र.

रात्र निवारा प्रकल्पाचे नाव व ठिकाण

संस्थेचे नाव, ठिकाण, संपर्क क्र.

1)

सेनादत्त सांस्कृतिक हॉल, सेनादत्त पेठ, पुणे-३०

पुणे युथ फाऊंडेशन, हडपसर पुणे, ९८२२३५१३५९

2)

दुध भट्टी समाजमंदीर, बोपोडी, पुणे

जान्हवी फाऊंडेशन, पुणे, ९८२२९४०८४८

3)

मदर तेरेसा समाजमंदिर, येरवडा, पुणे

जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, पुणे., ९८२२०१४४७१


योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः
१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४