घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Partnerships

NOBLE EXCHANGE

नोबल एक्स्चेंज

आदर पूनावाला स्वच्छ शहर चळवळीमार्फत नोबल एक्स्चेंज एन्व्हायरॉनमेंट सोल्युशन्स प्रा. लि. (एनईएक्स) चालविण्यात येते. तर सिरम इन्स्टिट्युट एनईएक्सला भागीदारीचे प्रकल्प राबविण्यासाठी सहकार्य करते. पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर तळेगाव येथे नोबल एक्स्चेंज हा ६५ कोटी रुपयांच्या प्रकल्प असून त्याद्वारे कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यामधून मिथॅनेशन तयार करण्यात येते.

नोबेल एक्सचेंजमध्ये ३ ZED प्रक्रिया होते

  • शून्य - दुर्गंधी
  • शून्य - ताज्या पाण्याची गरज
  • शून्य – जमिनी भरणा

नोबेल एक्सचेंजने अन्न कचर्‍यावर प्रक्रिया करणारे जगातील सर्वाधिक क्षमता असलेले दोन प्रकल्प उभारले आहेत. `बांधा, मालक बना आणि  चालवा’ या तत्त्वावर बंगळुरू आणि पुणे येथे हे प्रकल्प सुरू आहेत. संपूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पातून दरवर्षी २ लाक ३७ हजार २५८ टन अन्न कचर्‍यावर प्रक्रियाकरून त्यातून ११.७८८ टीपीए कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि ४३००० टीपीए सेंद्रिय खत निर्मिती होणार आहे.