शहरांची गणना

आमच्याबद्दल

जनगणनेच्या कालावधीत शहर जनगणना कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात उभारले जाते. शहर जनगणना कार्यालयात आवश्यक ते कर्मचारी पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातून नियुक्त केले जातात.

आम्ही काय करतो?

केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जनगणनेसंदर्भात तयार करण्यात आलेली कार्यपद्धती पुणे महानगरपालिकेच्या शहर जनगणना कार्यालयामार्फत अत्यंत काटेकोरपणे कार्यान्वित करण्यात येते.

पुणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात आम्ही खालील कार्य करतो –

  • दर दहा वर्षांनी करण्यात येणारी जनगणना
  • दर पाच वर्षांनी करण्यात येणारे आर्थिक सर्व्हेक्षण
  • सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना २०११
  • आम्ही २०११ सालापासून आधार प्रकल्पासंदर्भातील सेवाही देत आहोत
  • केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मातृभाषेसंदर्भातील सर्व्हेक्षण
  • आम्ही सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार जनगणना प्रमाणपत्र पुरवितो
  • सरकार आणि पुणे महानगरपालिकेचे सर्व विभाग यांच्यामध्ये समन्वयक म्हणून आम्ही काम करतो