इतर विभाग

पाणीपुरवठा विभाग

पाण्याचे टँकर :

ट्रकच्या चासीसवर बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टॅंकरद्वारे पिण्यासाठी आणि उद्यानांसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. या टॅंकरची क्षमता ६००० ते १०००० लिटर एवढी आहे. पुणे महानगरपालिकेकडे जीपीएस यंत्रणेसह ‍एकूण ३६ टँकर आहेत.

 


इलेक्ट्रिकल विभाग

इलेक्ट्रिक शिड्या :

विशेष कामासाठी वापरण्यात येणार्‍या आणि हायड्रॉलिकवर चालविण्यात येणार्‍या वाहनांचा उंचीवरील इलेक्ट्रिक देखभालीची कामे करण्यासाठी वापर करण्यात येतो. ३ मीटरपासून १८ मीटर अंतरापर्यंतच्या शिड्या असलेली २१ इलेक्ट्रिक शिड्या पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध आहेत.

 


इतर विभाग

खोदणारे यंत्र आणि लोडर मशीन :

पुणे महागरपालिकेकडे वेगवेगळ्या प्रकारचे ३० खोदणारी यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामध्ये जेसीबी, टाटा एक्स्कोर्टसचा समावेश आहे. याचा वापर अतिक्रमण, उद्यान, पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन विभागसाठी करण्यात येतो.

  ​