स्थानिक संस्था करभरणाकसा भराल एलबीटी

विक्रेत्यांकडे एकदा एलबीटी नोंदणी क्रमांक आला की ते एलबीटी भरू शकतात. त्यासाठी सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे -

1) तुमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंची एलबीटी नियमातील कलम `बी' नुसार यादी करा.  ज्या महिन्याचा एलबीटी भरायचा आहे त्या महिन्यातील प्रत्येक वस्तूची एकूण मासिक सरासरी (एकूण उपलब्ध साठ्यानुसार) किंमत लिहा. यादी करण्याचा आणखी एक सोपा पर्याय म्हणजे आमच्या संकेतस्थळावरून (pmc.mahalbt.com) एक्सल फॉरमॅटमधील `प्रमाणित दर पत्रक' डाऊनलोड करा आणि संबंधित वस्तूसमोर किंमती भरा. 

उदाहरणार्थ

वस्तू मासिक सरासरी किंमत
चांदीची ज्वेलरी ५,००,००००
सोन्याची ज्वेलरी १०,००,०००
इत्यादी.  

ब) त्यानंतर तुम्ही एलबीटी प्रणालीद्वारे तयार करण्यात येणारे चलन काढून घ्या (सविस्तर माहितीसाठी `चलन कसे काढायचे' हे सदर वाचा)

क) चलन तयार केल्याप्रमाणे रक्कम भरा (सविस्तर माहितीसाठी `देयक कसे भरायचे' हे सदर वाचा)

चलन कसे तयार करायचे?

1) जर तुमच्याकडे ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक युजरनेम आणि पासवर्ड असेल तर -

१.१) पीएमसी एलबीटी सिस्टीम (pmc.mahalbt.com) वर लॉग करा आणि `ईचलन' निवडा

१.२) तुमचा एलबीटी नोंदणी क्रमांक द्या आणि पासून पर्यंतची तारीख द्या

१.३) त्यानंतर तुम्ही Local Body Tax (चलनातील आठ क्रमांकाच्या रकान्यात) रक्कम भरा आणि येथील १.८ क्रमांकाच्या पायरीवरील पुढील कृती करा किंवा `LBT Calculator' वर क्लिक करून वस्तूनिहाय सविस्तर माहिती द्या

१.४) त्यानंतर पुढील स्क्रिनमध्ये वस्तू निवडण्यासाठी संबंधित वस्तूचा कोड (प्रमाणिक दर पत्रकाप्रमाणे) द्या किंवा वस्तूच्या नावाची पहिली काही अक्षरे टाईप करा. त्यानंतर त्या नावाच्या वस्तूंची यादी दिसेल त्यातून तुम्हाला ज्या वस्तूचा एलबीटी भरायचा आहे त्या वस्तूची निवड करा. 

१.५) वस्तूची एकूण निव्वळ किंमत भरा

१.६) आता सिस्टीमद्वारे संबंधित वस्तूवरील एलबीटी कर दाखविण्यात येईल.

१.७) याचप्रमाणे सर्व वस्तूंची भरा आणि एकूण एलबीटी कर बघा. तुम्हाला ही सर्व यादी एकाचवेळी पूर्ण करण्याची गरज नाही. यादी पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ घ्या आणि दिलेल्या किंमती पुन्हा एकदा तपासून बघा. तुम्ही अपूर्ण असलेली यादी सेव्ह करू शकता आणि नंतर उर्वरित माहिती भरून यादी पूर्ण करू शकता. भरलेली माहिती सेव्ह करण्यासाठी `सेव्ह' बटणावर क्लिक करा.  स्वागत पृष्ठावरील `My Challans' हा पर्याय निवडून तुम्ही चलनामध्ये बदल करू शकता तसेच जोपर्यंत तुम्ही चलनाची रक्कम भरली नाही तोपर्यंत कितीही वस्तू भरू शकता.

१.८) जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात वस्तू असतील तर फाईल अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. `प्रमाणित दर पत्रक' (Standard Rate List) डाऊनलोड करा, आवश्यक ते बदल करा आणि LBT Calculator च्या स्क्रिनवर देण्यात आलेल्या लिंकद्वारे फाईल अपलोड करा.

१.९) एकदा का तुम्ही `सेव्ह' बटण वर  क्लिक केले की तुम्ही चलनाच्या स्क्रिनवर पोहोचता. त्यानंतर तुम्ही जर कर ऑनलाईन भरत नसाल तर चलनाची प्रिंट घेऊ शकता.

१.१०) जर तुम्ही एलबीटी रोख / पे ऑर्डर / डीडी किंवा ऑनलाईन पद्धतीने भरणार असाल तर त्यासंदर्भातील सूचनांसाठी `पैसे कसे भरायचे?' सदर पाहा.