पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

पादचार्‍यांसाठी धोरण

पादचार्‍यांसाठी धोरण
 

 

शहरातील रस्त्यांचा वापर करणार्‍या सर्व घटकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा हेतू पुर्ण करण्यासाठी हे धोरण मैलाचा दगड ठरले आहे. वाहतूक समस्येवर शाश्वत उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक आणि पादचारी मार्गांचा विकास आवश्यक आहे. नागरिकांना स्वतःचे वाहन नसतानादेखील प्रवास करणे सोपे झाले तर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल. पर्यायाने वायुप्रदुषणदेखील आटोक्यात येईल.