उदयान विभाग

Select THEME PARKS

पेशवे साहसी उद्यान

थीम- अँड्व्हेंचर पार्क

मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहरातील पेशवे साहसी उद्यान सुप्रसिद्ध आहे. सारसबागेच्या शेजारी पर्वती मंदीर टेकडीच्या सान्निध्यात वसलेले पेशवे साहसी उद्यान लहान मुलांसाठी पर्वणीच आहे.

उद्यानातील प्रमुख आकर्षणस्थळे

लहान मुलांसाठी अँड्व्हेंचर पार्क - उद्यानात तीन ते सोळा वयोगटातील लहान मुलांसाठी नेट क्लायम्बिंग, वॉक रोप क्लायम्बिंग, टॉवर क्लायम्बिंगसारखे भरपूर साहसी क्रीडाप्रकार उपलब्ध आहेत. मात्र, यावेळी मुलांच्या सुरक्षिततेची संपुर्ण काळजी घेतली जाते. लहान वयात मुलांच्या मनात निर्माण होणारी भीती काढून टाकण्याचा यामागे उद्देश आहे.

शैक्षणिक मॉडेल्स

पुणे महानगरपालिकेने वेळोवेळी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या गरजेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. याअंतर्गत उद्यानात सौरऊर्जा, बायोगॅस प्रकल्पांची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

 

प्रवेश शुल्क

प्रौढ- प्रत्येकी १० रुपये

बालके – प्रत्येकी ४० रुपये

उद्यानाच्या वेळा

दररोज स.१०.०० ते १.००

दुपारी २ ते ५.३०

पत्ता- सारसबाग, सदाशिव पेठ

Google Map