पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

रस्ते बांधणीत प्लॅस्टिकचा वापर

  • शहरातील घनकचर्‍यात विषारी प्लॅस्टिकचे प्रमाण सुमारे 5 टक्के आहे. या कचर्‍यामुळे पर्यावरणाला मोठा धोका आहे. हा धोका कमी करण्यासाठी या प्लॅस्टिक कचर्‍याचा रस्ते बांधणीत कसा पुनर्वापर करता येईल यासंदर्भात विविध प्रयोग करुन पाहण्यात आले.
  • रस्तेबांधणीसाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये टाकाऊ प्लॅस्टिक मिसळले तर त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होते, असे विविध प्रयोगाअंती आढळून आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने रस्तेबांधणीसाठी टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

खालील रस्त्यांवर या प्रयोगाची चाचणी करण्यात आली आहे -

  1. दत्तवाडी काका हलवाई लेन
  2. कात्रज डेअरी
  3. मगरपट्टा सिटी एचसीएमटीआर रोड
  4. कवडे माला रोड
  5. कोरेगाव पार्क लेन नं ३
  6. चंद्रमा चौक ते येरवडा सदल बाबा दर्गा रोड