माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

पीएमसी केअर

पीएमसी केअरविषयी...

पीएमसी केअर नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभागातून सर्वसमावेशक पद्धतीनं सेवा पुरविण्याचं काम करणार आहे. पीएमसी केअर म्हणजे नागरिक(सिटीझन) सहाय्य(असिस्टन्स) प्रतिसाद(रिस्पॉन्स) आणि संवाद(एंगेजमेंट). आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी पुणेकरांना केंद्रस्थानी ठेवत डिजिटल माध्यमांचा उपयोग करुन पीएमसी केअर ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. यात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवण्यात आलेल आहे. बहुमाध्यमांचा वापर करुन कार्यक्षम पद्धतीनं नागरिकांना सहाय्य करणं, माहिती आणि प्रतिसाद देणं हा पीएमसी केअरचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया पुर्वीपेक्षा अधिक वेगवान, सोपी, विश्वासार्ह आणि परिणामकारक करण्यात आली आहे. पीएमसी केअरमुळे पुणेकरांसाठी महापालिका प्रशासन एक पाऊल पुढे आलं आहे.

पीएमसी केअरची आवश्यकता

दुरदृष्टी ठेवून काम करणारी प्रशासकीय संस्था म्हणून पुणे महानगरपालिकेचं नाव कायमच घेतलं जातं. अधिक उत्तम पद्धतीनं सेवा देऊन महानगरपालिकेला प्रत्येक पुणेकराचं जीवनमान उंचवायचं आहे. नागरिकांच्या केवळ समस्या सोडविणं उपयोगाचं नसून, त्यांना प्रशासकीय कामातदेखील सामावून घेण्याची आवश्यकता आहे याची जाणीव महापालिकेला आहे. सहाय्य, प्रतिसाद आणि संवाद हे पीएमसी केअरच्या रचनेचे महत्त्वाचे घटक आहेत. महानगरपालिका नागरिकांसाठी एक पाऊल पुढे आली आहे. भारतातील महत्त्वाच्या आयटी सिटीपैकी एक असलेल्या पुण्यात जगातील आघाडीच्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत. नागरिकांच्या गरजा आणि डिजिटल माध्यमांची ताकद लक्षात घेऊन महानगरपालिकेनं पीएमसी केअरमध्ये त्यांचा समावेश केला आहे. प्रत्येक नागरिकाला सेवा पुरवणं हे पीएमसी केअरचं मुख्य उद्दिष्ट आहे. बहुमाध्यमांचा वापर करुन नागरिकांना सेवा पुरवताना त्यांचं समाधान होणं सर्वत महत्त्वाचं आहे. अधिक उत्तम पद्धतीनं सेवा पुरवण्यासाठी सातत्यानं नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेतला जाणार आहे.

पीएमसी केअरमधील विविध माध्यमः

 • मोबाईल अॅप- PuneConnect, वेबसाईट- http://complaint.punecorporation.org/
 • सोशल मिडीया- फेसबुक/pmcfmc & ट्विटर @pmcpune
 • गुगल प्लस- /pmcfmc & कॉल सेंटर- १८०० १०३० २२२
 • व्हॉट्सअॅप- ९६८९९००००२/ एसएमएस- ९६८९९००००२
 • ई-मेल- feedback [at] punecorporation [dot] org

नागरिक

पुणेकर नागरिक पीएमसी केअरच्या केंद्रस्थानी आहेत. पुणेकर हे नेहमीच स्वयंप्रेरित असतात. एखादा फोन कॉल, सोशल मिडिया अशा माध्यमांचा वापर करुन त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात. यशस्वी प्रशासकीय कामकाजासाठी नागरिकांचा सहभाग आणि सुसंवाद हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रशासनात नागरिकांना सामावून घेण्यासाठी महानगरपालिकेने विविध माध्यमं सादर केली आहेत. नागरिकांसाठी सोशल मिडीया आणि एसएमएस, कॉल सेंटर उपलब्ध आहे. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना सेवा पुरवण्यास पीएमसी केअर आणि महानगरपालिकेकडून प्राधान्य दिले जाणार आहे.

सहाय्य

तुम्हाला काही मदत हवी आहे का? पीएमसी केअर नेहमी विचारले जाणारे प्रश्न(FAQ) एकदा पहा. महानगरपालिकेनं नागरी प्रशासनातील सर्व माहिती नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हे नेहमी विचारले जाणारे प्रश्न उपलब्ध आहेत. त्यातूनही, नागरिकांचं समाधान झालं नाही, तर महानगरपालिका संबंधित विभागाच्या माध्यमातून नेहमी विचारले जाणारे प्रश्न अद्ययावत करुन ठोस माहिती उपलब्ध करुन देते. माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींप्रमाणे स्वयंप्रेरणेनं माहिती देण्याचा महानगरपालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.

प्रतिसाद

एखाद्या नागरिकाला हवी असलेली माहिती नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांतून सर्वसाधारणपणे मिळते. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट माहिती हवी असल्यास प्रतिसादासाठी विविध माध्यमं कार्यरत आहेत. अशावेळी महापालिकेशी संवाद साधण्यासाठी कॉल सेंटर किंवा एसएमएसचा क्रमांक उपलब्ध आहे. नागरिकांसाठी सोशल मिडीया कार्यरत असेल. मोबाईल अॅप्लिकेशन, फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, व्हॉटसअॅप असे विविध पर्याय कार्यान्वित करण्यात आले असल्यानं त्यामुळे आता महानगरपालिका केवळ एक कॉल किंवा एक क्लिक दूर आहे.

संवाद

पुणेकरांच्या सबलीकरणाच्यादृष्टीनं पीएमसी केअर हे एक पाऊल आहे. अनेकदा नागरिकांकडे उपयुक्त कल्पना आणि सूचना असतात. शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला त्याचा लाभ होऊ शकतो. पीएमसी केअर या संकल्पनेत प्रतिसाद हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं नागरिकांच्या समस्या आणि सूचना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेतल्या जातात. त्यामुळे नागरिकांच्या गरजेनुसार माहिती आणि प्रतिसाद दिला जाऊ शकतो.

पुणे महानगरपालिकेपर्यंत पोहोचण्याची माध्यमे

 • विनाशुल्क दूरध्वनी क्रमांक: १८०० १०३० २२२
 • व्हॉटसअॅप / एसएमएस : ९६८९९ ००००२
 • फेसबुक आणि गुगल+ : /pmcfmc
 • ट्विटर: @pmcpune
 • मोबाईल अॅप: Play Store and App Store/PuneConnect
 • Website: complaint.punecorporation.org