शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व क्लायमेट रेझीलियन्स् करीता करार (MoU)

शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व क्लायमेट रेझीलियन्स् करीता करार (MoU)

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व क्लायमेट रेझिलियन्स् करीता Natural Resources Defense Council (NRDC) व Indian Institute of Public Health – Gandhinagar (IIPH-G) या संस्थांसोबत करार करण्यात आला. या दोन्ही संस्था पुणे शहरातील आय.आय.टी.एम., पाषाण या संस्थेबरोबर काम करणार आहेत. आय.आय.टी.एम. संस्था व पुणे महानगरपालिका यांच्या सहभागातून सफर (SAFAR) या उपक्रमातंर्गत पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणातील हवा प्रदूषणाच्या प्रमुख घटकांचे प्रमाण मोजण्याची चाचणी यंत्रे बसविली आहेत.

या करारांतर्गत पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता आणि हवा प्रदूषणाशी निगडीत आजारांची माहिती व आरोग्यावर होणारे परिणाम या संबंधी काम करण्यासाठी हेल्थ रिस्क कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. सदर प्लॅन मध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी अलर्ट सिस्टीम, हवा प्रदूषणासंबंधी विविध विभागांमध्ये सुसूत्रता, जनजागृती उपक्रम घेण्यात येणार आहेत. हवा प्रदूषणासंबंधी स्वास्थ्याच्या दृष्टीने नागरिकांनी घ्यावयाची काळजी व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

शहरासाठी “कूल रुफ्स्” ही नवीन संकल्पना मांडण्यात येणार आहे. या “कूल रुफ्स्” पॉलिसिमध्ये इमारतीच्या आतील तापमान कमी होण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. यामुळे इमारतींमधील ऊर्जेची बचत होणार आहे. अशा कूल रुफ्स मुळे ऊर्जा बचत तर होतेच परंतु इमारतींमध्ये नैसर्गिक पद्धतीने थंडावा दीर्घकाळ टिकण्यास देखील मदत होते. जागतिक पातळीवर अशा रुफ्स् ना मान्यता मिळाली असून यामुळे अर्बन हिट आयलंड इफेक्ट कमी करण्यास देखील मदत होते. भारतीय शहरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी “कूल रुफ्स्” महत्वाची भूमिका बजावतात. “कूल रुफ्स्” पेंट केल्याने देखभाल खर्च कमी होतो तसेच जास्त काळ टिकतो. यामुळे ए.सी.च्या बिलामध्ये अंदाजे २०% इतकी बचत होते.

पुणे शहरच्या एकूण चांगल्या राहणीमानाकरीता शहरातील हवेची गुणवत्ता चांगली ठेवणे देखील महत्वाचे आहे. हवा प्रदूषण कमी करणे शहरासाठी गरजेचे असून यासाठी पुणे महानगरपालिका तसेच इतर संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहेत, असे मा.महापौरांनी व्यक्त केले.

एयर क़्वालिटी मॅनेजमेंट प्लॅनचा मुख्य उद्देश हा हेल्थ रिस्क कम्युनिकेशन, माहिती प्रसरण आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे आहे व या माधमातून हवेची गुणवत्ता नॅशनल एयर क़्वालिटी स्टॅन्डर्डस् साध्य करण्यात येणार आहेत, अशी माहिती मा. महापालिका आयुक्त यांनी दिली.

पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन मंत्रालय (MoEFCC) द्वारे जानेवारी २०१९ मध्ये National Clean Air Program (NCAP) हा प्रोग्रॅम सुरु करण्यात आला. त्या अंतर्गत सन २०२४ पर्यंत भारतातील शहरांचे हवा प्रदूषण २०-३०% कमी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा प्रोग्रॅम एकूण १०२ शहरांमध्ये राबविला जाणार असून ‘पुणे शहर’ त्यांपैकी एक आहे.

आय.आय.टी.एम.,पाषाण ही संस्था एयर क़्वालिटी मॅनेजमेंट साठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. डॉ. गुफरान बेग, प्रोजेक्ट डायरेक्टर, SAFAR आणि सिनियर अॅटमॉस्फेरिक सायंटिस्ट, म्हणाले कि, पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता ही भारतातील इतर मोठ्या शहरांपेक्षा चांगली असून ती सध्या वेगाने प्रदूषित होत आहे.

हवा प्रदूषणाची समस्या विविध विषयांशी निगडीत असल्यामुळे त्याचे उत्तर विविध स्वरूपांत शोधणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय स्तरावर विविध विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे तसेच नागरिकांना स्वास्थ्य संबंधी माहिती पुरविणे आवश्यक आहे, असे Indian Institute of Public Health – Gandhinagar (IIPH-G) चे डॉ.दिलीप मावळणकर म्हणाले.