अतिक्रमण धोरणे

पथ विक्रेता अधिनियम - २०१४

प्रस्तावना:- शहरातील अनधिकृत पथविक्रेत्यांचे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे, त्यामुळे रस्ता व पदपथावर नागरिकांना रहदारीस व वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी "पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम – २०१४" हा कायदा केंद्र सरकारने तयार करून सर्व राज्यात लागू केला आहे, त्याची पुणे महानगरपालिकेकडून अंमलबजावणी चालू केली आहे.

उद्दिष्टे:- पदपथ/रस्ते वाहतुकीस व रहदारीस विना अडथळा उपलब्ध राहून फेरीवाला क्षेत्रातील पदपथावरील अधिकृत पथ विक्रेत्यांना व्यवसायास जागा उपलब्ध करून देणे व अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे. शहरातील अधिकृत पथ विक्रेत्यांचे फेरीवाला क्षेत्रात पुर्नवसन करणे व अधिकृत पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेचे संरक्षण होईल याची काळजी घेणे. शहरातील रस्त्यावर पथविक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे.

पथ विक्रेता अधिनियम - हिंदीइंग्रजी

फेरीवाले नियमन २०१६

NULM मार्गदर्शक तत्वे (केंद्र शासन)

पथ विक्रेता योजना २०१७ (महाराष्ट्र शासन)

NULM महाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचना

पथ विक्रेता नियम व आदेश (महाराष्ट्र शासन)


पुणे महानगरपालिका-मंडप धोरण-२०१५

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी विविध सर्वधर्मीय सार्वजनिक सण/उत्सव उदा. गणपती/नवरात्रौत्सव, दहिहंडी उत्सव, रमजान ईद, नाताळ इत्यादी तसेच सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजर्‍या करताना संबंधित सार्वजनिक मंडळे, संस्था/संघटना, नागरिक यांचेकडून पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्ता, पदपथांवर मंडप/स्टेज उभारण्यात येतात. याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २३४ अन्वये पुणे महानगरपालिकेकडून अधिकृत परवानगी देणेकरिता मा. मुख्य सभेने वेळोवेळी मान्य केलेल्या प्रचलित मान्य दरांनुसार आकारणी करुन परवानगी देण्याचे काम मनपाच्या उप आयुक्त (अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग) या कार्यालयाचे नियंत्रणाखाली सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून करण्यात येत होते.

परंतु सार्वजनिक समारंभाच्या व उत्सवांच्या प्रसंगी रस्ता/पदपथांवर उभारण्यात येत असलेल्या मंडपासंदर्भांत मा. उध न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका क्रमांक १७३/२०१२ सोबत सिव्हील अ‍ॅप्लिकेशन क्रमांक १२४/२०१४ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.१३ मार्च २०१५ व दि.१४ जून २०१५ रोजी महानगरपालिकांच्या आयुक्तांना मुंबई अधिनियम १८८८ च्या कलम ३१७ व महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २३४ अन्वये असलेल्या अधिकारासंदर्भांत सविस्तर विवेचन करुन त्यानुसार कार्यवाही करणेकरिता शासनास निर्देश दिले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक याचिका २०१५/सं.क्र.८७८(१)/नवि ३४, मंत्रालय, मुंबई-३२ यांचे दि.६ जुलै २०१५ रोजीचे कार्यालयीन परिपत्रकान्वये पुणे महानगरपालिकेस वरिल प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नव्याने सर्वकष मंडप उभारणी करिताचे धोरण तयार करुन त्याची अंमलबजावणी करणेस आदेश प्राप्त झाले.

पुणे महानगरपालिका-मंडप धोरण-२०१५ - मराठी इंग्रजी

ध्वनी प्रदूषण नियम २००० व अनधिकृत मंडप संदर्भात कार्यवाहीबाबत

ध्वनी प्रदूषण नियम-२००० ची अंमलबजावणीबाबत

ध्वनी प्रदूषण नियम-२००० ची अंमलबजावणीबाबत नियम

मंडप धोरण मार्गदर्शक तत्वे


शेतकरी आठवडे बाजार धोरण-२०१६

प्रस्तावना:- महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील शासन निर्णय क्र.कृपमं-०८१६/प्र.क्र.११९/२१ स, दि. १२ ऑगस्ट २०१६ अन्वये शहरी भागात शेतक-यांचा माल शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरीता संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान राबविणेबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. २४ ऑगस्ट २०१६ चे परिपत्रकान्वये वरिल अभियान राबविणेबाबत महानगरपालिकेस निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महानगरपालिका स्तरावर शेतकरी आठवडे बाजार भरविणेकरिताचे शेतकरी आठवडे बाजार महानगरपालिका धोरण २०१४ हे धोरण तयार करण्याचे महानगरपालिकेने ठरविले. प्रस्तुत अभियानासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांनी प्रस्तावाद्वारे केलेल्या मागणीनुसार महानगरपालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड/ताब्यातील अॅमिनिटी स्पेसच्या जागा, तसेच म.न.पा. मान्य विकास योजनेमधील आरक्षण असलेल्या ताब्यातील मोकळ्या जागा शेतकरी आठवडे बाजार भरविणेकरीता आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या एका दिवसाकरीता मान्य भुईभाडे आकारून देण्यात येतील.

उद्दिष्टे:- शासन अभियानानुसार राज्यातील शेतक-यांनी/त्यांचे समुह गटांकडून स्वत: उत्पादित केलेला ताजा व स्वच्छ शेती माल वाजवी दरात शहरातील ग्राहकांना आठवडे बाजारामध्ये थेट विक्री केला जाणार असल्याने शेतक-यांना चांगला बाजारभाव मिळून उत्पन्न मिळेल. तसेच शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला/फळे वाजवी दरात उपलब्ध होतील. यामुळे शहरातील पदपथांवर भाजीपाला/फळे विक्री करणा-या अनधिकृत पथारी व्यवसायिकांची अतिक्रमणे देखील कमी होतील.

शेतकरी आठवडे बाजार-धोरण-२०१६ मराठी इंग्रजी

शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविणेबाबत

शेतकरी आठवडे बाजार महानगरपालिका सभा ठराव


अनधिकृत धार्मिक स्थळे

अनधिकृत धार्मिक स्थळे महानगरिापिका स्तरीय समितीबाबत  पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनधिकृत प्रार्थना स्थळांचे बांधकाम पाडणे नियमित कारण्यासंबंधाने निकष ठरविण्याबाबत  पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनधिकृत धार्मिक स्थळे धोरण पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन कारवाईचा अहवाल -वर्गवारी बी  पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन कारवाईचा अहवाल -वर्गवारी क पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

२०१६ मध्ये वृत्तपत्रात प्रकाशित झालेली अनधिकृत धार्मिक स्थळे यादी


बेवारस वाहने - शासन निर्णय

बेवारस वाहने - मे. उच्च न्यायालयाचे निर्देश