Quick Links
बाह्य दुवे
-- परिणाम आढळला नाही --
OVERVIEW & FUNCTIONING
पुणे महानगरपालिकेचा प्रकल्प विभाग नागरिकांना शहरात सार्वजनिक आणि विना-मोटार वाहतूकीचे सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे पर्याय उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी कार्यशील आहे. विभागाने पार्किंग, स्मार्ट वॉक, अवजड वाहन वाहतूक यासारख्या प्रमुख प्रकल्पांवर काम केले आहे. विविध वाहतूक आणि दळणवळण प्रकल्पांचे नियोजन, रचना, विकास, अंमलबजावणी आणि देखभालीसाठी आवश्यक निधी वाटपासाठी काम करते. विभागाच्या काही प्रकल्पांमध्ये चौकाची रचना, रस्त्यावरील व रस्त्याबाहेरील पार्किंग, ट्रक टर्मिनल्स, उड्डाण पूल, रेल ओव्हर ब्रिजेस, सबवेज् आणि विविध ट्रॅफिक सर्व्हेजचे आयोजन, बायसिकल प्लॅनचा अभ्यास इत्यादीचा समावेश आहे. पुणे शहराच्या बायसिकल प्लॅनविषयी अधिक माहितीसाठी www.punecycleplan.wordpress.com येथे क्लिक करा.
वाहतूक विभागाकडून रस्ते, चौक, उड्डाणपूल, रेल ओव्हर ब्रिजेस, सबवेज् आणि पार्किंग लॉट्सला नाव देण्याविषयी मत व्यक्त केले जाते.
आम्ही मुळा आणि नद्यांच्या काठावरील सुमारे ४४ किलोमीटरचा परिसर तर रामनदीभोवतालचा १२ किलोमीटरचा परिसर विकसित करण्याबाबतच्या प्रकल्पांवर काम करीत आहोत. शासनाचे नऊपेक्षा अधिक विभाग या प्रकल्पावर काम करीत आहेत. या प्रकल्पाविषयी आणखी माहिती वाचण्यासाठी https://www.pmc.gov.in/mr/riverfront .
येथे क्लिक करा.
याशिवाय, विभागाकडून नदी किंवा नाल्याच्या काठी राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांसाठी ३७५२ घरांचे बांधकाम प्रकल्पाचे काम केले जात आहे. याशिवाय, सामाजिक संस्थांच्या साह्याने किंवा स्वतःच्या पैशाने घर बांधू पाहणाऱ्या ४००० झोपडपट्टीधारकांना मदत करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता(प्रकल्प) हा प्रकल्प विभागाचे नेतृत्व करीत असतो. अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) यांच्यातर्फे विभागाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. विभागाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये बांधकाम अभियंता आणि ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, हायवे इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शम अँड मॅनेजमेंट आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
खात्याच्या जबाबदाऱ्या
पुणे शहरातील चौकांमध्ये होणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी नद्यांवर नव्या पूल व उड्डाणपूलाचे बांधकाम करणे व जुन्या पुलांचे पुनर्वसन करणे ही मुख्य अभियंता(प्रकल्प) विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. याशिवाय, विभागामार्फत पार पाडण्यात येणाऱ्या कामांची यादी खालीलप्रमाणेः
- पादचारी धोरण तयार करणे
- पुणे सायकल प्लॅनची (एनएमटी सेल) निर्मिती व अंमलबजावणी
- नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल (ओव्हरब्रिज) आणि सबवे तयार करणे
- पार्किंगसाठी ठिकाणे तयार करणे व पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करणे
- यांत्रिक कार पार्किंगचे बांधकाम आणि देखभाल
- रस्त्यांवर पे अँड पार्क योजनांची अंमलबजावणी
- पुणे महानगरपालिका यांच्या नव समितीशी समन्वय साधून रस्ते चौकांची नावे निश्चित करणे
- पुणे मेट्रो
- नदी परिसर विकास
- जेएनएनयूआरएमच्या बीएसपी योजनेअंतर्गत शहरातील गरजू, फेरीवाल्यांचे पुनर्वसन त्यांच्यासाठी घरे, वसतीगृहांची निर्मिती
वाहतूक नियंत्रण विभागाचे उपविभाग खालीलप्रमाणे-
- रहदारी व्यवस्थापन
- पूल, फ्लायओव्हर, पादचाऱ्यांसाठी ओव्हरब्रिजेस आणि सबवे प्रकल्प
- पुणे मेट्रो
- जे.एन.एन.यु.आर.एम अंतर्गत बीएसवायपी आणि निर्मिती प्रकल्प
- नदी परिसर विकास
Projects
Completed Projects
Ongoing Projects
Proposed Projects
Media Gallery
DEPARTMENT INFORMATION
HOD's Note
Key contact
खाते प्रमुख
खाते प्रमुखाचे नाव: श्री. श्रीनिवास बोनाला
पदनाम: मुख्य अभियंता (प्रकल्प)
ई-मेल आयडी: srinivas.bonala@punecorporation.org
मोबाइल क्रमांक: +91 9689931380
आईटी नोडल ऑफिसर
नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. श्वेता निलेश बोधे
पदनाम: कनिष्ठ लिपिक
ई-मेल आयडी: ceproject@punecorporation.org
मोबाइल क्रमांक: +91 9860327273
विभागाची माहिती
विभाग पत्ता: मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालय, 3 रा मजला, मुख्य इमारत, (जुने नगर सचिव कार्यालय), शिवाजीनगर, पुणे- 411 005.
दूरध्वनी क्रमांक:
ई-मेल आयडी: ceproject@punecorporation.org