आमच्या बद्दल

मिळकत कर इतिहास

सन १९५० पासून पुणे महानगरपालिका पुणेकरांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्यरत आहे. पुणेकरांना उत्कृष्ट दर्जाच्या सेवे-सुविधा देण्याकरता पुणे महानगर पालिका कटीबद्ध आहे.

शिक्षणाचे माहेरघर असलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले भारतातील एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारे शहर आहे. सन १९५० पासून पुणे महानगरपालिका पुणेकरांची सेवा करण्यात कार्यरत आहे. पुणे शहराच्या IT शहर या ओळखीप्रमाणेच पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन सेवा पुरविण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. पुणेकरांना चांगल्या सेवा पुरविण्यासाठी जास्तीत जास्त माहिती तंत्रज्ञानाचा व मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.पुणे महानगर पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने ई-प्रशासनानावर भर देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने कर आकारणी व कर संकलनास सुरुवात करून एक उत्तम पाउल उचलले आहे. कुठल्याही शहराचा विकास हा त्या शहरातून सुलभ पद्धतिने कर जमा होणे व योग्य कर आकारणीवर अवलंबून असतो.

मिळकत कर विभाग

मिळकत कर हा व्यक्तीच्या प्रत्यक्ष वा वैयक्तिक मालमत्तेवर महापालिकेने ने ठरवून दिलेला कर आहे. शहरातील प्रत्येक मालमत्तेला योग्य कर आकारणी करून मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम ठरवली जाते व त्यावर कर आकारला जातो. आपल्या मिळकतीला लावण्यात आलेला कर हा मिळकतीच्या चटई क्षेत्रास संबंधित विभागासाठी निश्चित केलेल्यादराने गुणून आकारला जातो. आपण आपल्या मालकीच्या सर्व मिळकतीवरील मिळकत कर हा भरण्यासाठी कटीबद्ध आहोत. आपल्या हद्दीतील सर्व मिळकातीना मिळकत कर आकारण्याची व संकलन करण्याचे काम महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते.

खालील प्रकारच्या मिळकातीना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायद्यांतर्गत मिळकत कर लागू शकतो रहिवासी घर (स्वत:च्या मालकीचे वा दुसरयाच्या मालकीचे), कार्यालय इमारत, कारखाना इमारत, गोडाऊन, दुकान, सदनिका, मोकळी जागा इ.

माहितीची ठिकाणे​

नागरीक सुविधा केंद्र येथे एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मनपाचे दाखले तसेच इतर विविध शासकीय सेवा पुरविल्या जातात.

आपण आपला मिळकत कर विविध बँकेत भरू शकतो उदा. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बँक, जनता बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक आणि इतर.

Pmc Care Master Tag: