मिळकत कर धनादेशाद्वारे भरण्याबाबत महत्वाची सूचना

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मिळकत कर भरताना मोठ्या प्रमाणात मिळकत धारक मिळकत कराचा भरणा धनादेशाद्वारे करतात. मिळकत कराचे वसूली पथकही धनादेशाद्वारे मिळकत कराची वसूली करते. परंतु अनेकदा मिळकत धारक केवळ मिळकत कर विभागाच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी धनादेश देतात व नंतर असे धनादेश अनादरित होतात. सबब अशा बाबीस आळा घालण्यासाठी यापुढे अशा मिळकत धारकांवर कर आकारणी व कर संकलन विभाग फौजदारी खटला दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत कर आकारणी व कर संकलन विभागाने याकरिता एकूण नऊ मिळकत धारकांना या कायदेशीर कारवाईबाबत नोटीस पाठविल्या आहेत. विहीत मुदतीत सदरील मिळकत धारकांनी कराचा भरणा न केल्यास फौजदारी खटला भरणेकामी पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

तरी पुरे महापालिकेच्या सर्व मिळकत धारकांना आवाहन करण्यात येते की, मिळकत कराचा भरणा धनादेशाद्वारे करताना धनादेश अनादरित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा उपरोकत् नमूद कारवाईस सामोरे जावे लागेल.

 

(विलास कानडे)
सह महापालिका आयुक्त तथा कर आकारणी व कर संकलन प्रमुख
पुणे महानगरपालिका