जाहीर प्रगटन

दि.०५ मार्च २०२० रोजी स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय ,मे. केंद्र शासन , दि. १४ मार्च २०२० मे. राज्य शासनाने व मा. जिल्हाधिकारी , पुणे यांनी करोना विषाणूमुळे (COVID-19) उद्भभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी निर्देश दिले असून त्यानुसार करोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आयोजित केलेला ऑनलाइन लॉटरी सोडतीचा दि. २१.०३.२०२० रोजी १.०० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे-४११०४२ येथे आयोजित केलेला ऑनलाइन घरकुल सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे. यापुढील सोडतीची तारीख व वेळ अलहिदा जाहीर करण्यात येईल याची संबधित अर्जदारांनी नोंद घ्यावी.