Pune Attractions

पर्वती टेकडी आणि मंदीर

पर्वती टेकडी ही पुणे शहरातील निसर्गरम्य स्थळांपैकी एक आहे. येथील विविध देवतांची मंदीरे शहरातील सर्वात जुनी वारसास्थळे असून पेशवे साम्राज्याची आठवण करुन देतात. पर्वतीच्या माथ्यावरुन संपुर्ण शहराचे दृश्य पाहायला मिळते. शहरातील विविध वयोगटातील नागरिक देवदर्शन, विरंगुळा आणि व्यायामासाठी पर्वतीला भेट देतात.


आगाखान पॅलेस

आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सुलतान मोहम्मद शाह, आगा खान ३ रा याने  1892 आगाखान पॅलेस बांधला. प्रिन्स करिम अल हुसेनी, आगा खान ४ था याने ही वास्तू 1969 साली भारताला देणगी स्वरुपात दिली. याशिवाय, महात्मा गांधींचे आयुष्य आणि त्यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याचा आगाखान पॅलेसशी महत्त्वाचा संबंध आहे. महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि सहकारी महादेव देसाई यांचे या वास्तूमध्ये निधन झाले. वास्तूबाहेरील परिसरात त्यांची  स्मारके बांधण्यात आली आहेत. गांधींजींच्या अस्थींचे जतन करुन ठेवण्यात आले आहे. हा पॅलेस कस्तुरबा गांधी मेमोरियल हॉल किंवा कस्तुरबा समाधी म्हणून देखील ओळखला जातो.        


लाल महाल

शहाजीराजे भोसले यांनी बांधलेल्या लाल महालात शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांचे बराच काळ वास्तव्य होते.  याच वास्तूमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती. मुघल बादशहा औरंगजेब याने इ.स. 1660 साली आपला मामा शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांवर चाल करुन जाण्यास सांगितले.  शाहिस्तेखानाने त्यानंतरच्या काळात चाकणचा किल्ला ताब्यात घेऊन लाल महालात आपला मुक्काम ठोकला होता.

भोसले यांनी बांधलेल्या लाल महालात शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांचे बराच काळ वास्तव्य होते. शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात गेले. याच वास्तूमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती.  शिवाजी महाराजांच्या अनेक शत्रुंनी महालावर चढविलेल्या हल्ल्यांमुळे आज मूळ महाल अस्तित्वात नाही. पुणे महानगरपालिकेने महालाचे पुन्हा बांधकाम करून ही वास्तू जतन केली आहे.


उद्याने आणि प्राणी संग्रहालये

शहरात कमला नेहरु पार्क, संभाजी पार्क, शाहू उद्यान, पेशवे पार्क, सारसबाग आणि बंड गार्डन यासारखी अनेक सुप्रसिद्ध सार्वजनिक उद्याने आहेत. शहरात एक प्राणी संग्रहालयदेखील आहे. सुरुवातीला हे संग्रहालय पेशवे पार्क येथे होते. मात्र, आता सर्व प्राण्यांना कात्रज येथील राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात हलविण्यात आले आहे. या संग्रहालयात पुर्वीपासून सर्पोद्यानदेखील आहे. याशिवाय, शहरात जपानमधील प्रसिद्ध ओकायामा कोरोक्वेन उद्यानाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. उद्यानाला महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचे नाव  देण्यात आले आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ असा नावलौकिक आहे. पुणे विद्यापीठाची स्थापना 10 फेब्रुवारी, 1949 रोजी झाली. त्यानंतर, 2014 मध्ये विद्यापीठाचे नामांतरण करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात 18 महाविद्यालये आणि 8000 विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न होते. हळुहळु विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या वाढली आणि 2004 अखेर 46 पदवी विभाग, 269 संलग्न महाविद्यालये आणि 118 मान्यताप्राप्त संशोधन केंद्रे विद्यापीठाशी जोडली गेली.  


शनिवारवाडा

पुण्यातील सुप्रसिद्ध शनिवारवाडा हा अठराव्या शतकापासून मराठा राज्यकर्ते पेशव्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. वास्तूचे बांधकाम शनिवारी सुरु झाल्याने त्याला शनिवारवाडा असे नाव पडले आहे. पहिला बाजीराव पेशव्यांच्या राज्यात इ.स. 10 जानेवारी, 1730 रोजी वास्तूची पायाभरणी झाली व त्यानंतर इ.स. 1732 मध्ये वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. अत्यंत मजबूत रचना असणार्‍या या वास्तूला  पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. शनिवारवाड्याचे उत्तरेकडे तोंड असलेले २१ फूट उंचीचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा म्हणून ओळखले जाते. शनिवारवाड्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरु झाल्यानंतर वास्तूच्या मूळ आराखड्यात अनेक बदल करण्यात आले. अखेर, भोवताली चार मोठे आणि अनेक छोटे छोटे कारंजे असणारी शनिवारवाड्याची सात मजली इमारत दिमाखात उभी राहिली.

पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात शनिवारवाड्याची इमारत उभी असून, वास्तूच्या अंगणात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वास्तूच्या अंगणात पहिले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. वास्तूच्या परिसरात ‘वारसा’ नावाचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात हाताने तयार केलेल्या पारंपरिक वस्तू, पुस्तके आणि स्मृतीचिन्हांची विक्री केली जाते. पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या अंगणात ध्वनी आणि प्रकाशाचा मिलाफ असणारा अनोखा प्रयोग सुरु केला आहे.  मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार्‍या कार्यक्रमाचे रोज दोन प्रयोग पार पडतात. संध्याकाळी 7.15 ते 8.10 दरम्यान चालणारा पहिला प्रयोग मराठी भाषेत असतो तर 8.15 ते 9.10 दरम्यान चालणारा दुसरा प्रयोग इंग्रजी भाषेतील असतो. संध्याकाळी साडेसहापासून कार्यक्रमाची तिकीटे मिळायला सुरुवात होते.


Pmc Care Master Tag: