वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

पुणे कॉफी टेबल बुक

ऐतिहासिक पुणे शहराची अद्वितीय ओळख जतन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘पुणे दि सिटी ऑफ लाईफ’या शीर्षकाखाली कॉफी टेबल बुकची निर्मिती केली आहे.  यामध्ये पुण्यातील वारसास्थळे, इतर महत्वाची स्थळे, पुण्यातील संस्कृती, कला आणि मनोरंजन तसेच उद्योगांमध्ये क्षेत्रात पुण्याचे योगदान, शहराची खाद्य संस्कृती इत्यादी बाबींचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच पुस्तक वाचणाऱ्यांना शहरातील पर्यटनस्थळांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

एकुण ६६ छायाचित्रकार आणि २२ संस्थांनी उपलब्ध करुन दिलेली तब्बल ३३० छायाचित्रे व त्यांची माहिती कॉफी टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.  प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. पुणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची रचना व छपाई इमेज मिडीया या संस्थेने केली आहे.  

 

Coffee Table Book