SOLID-WASTE SERVICES

Select SOLID-WASTE SERVICES

Pune Pattern of ladies toilets

महिलांच्या शौचालयाचा पुणे पॅटर्न 

'मिळुन साऱ्याजणी' या संस्थेने २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिकेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील कलम २२६ अंतर्गत पुणे महानगरपालिकेला महिलांसाठी योग्य स्वच्छतागृहांची आवश्यक तरतूद करण्याचे निर्देश दिले होते.  
  
पुणे महानगरपालिकेने महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालये आणि मुतारीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. 
•    महिलांसाठी अतिरिक्त शौचालये आणि मुतारीची सुविधा निर्माण करणे 
•    उपयुक्तता आणि आवश्यकतेनुसार पुरुष स्वच्छतागृहांचे महिला स्वच्छतागृहांमध्ये रुपांतर करणे 
•    या सुविधांची योग्य देखभाल करण्याकरिता महानगरपालिका कर्मचारी आणि केअरटेकर्सना तयार करणे 
•     महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणा-या सुविधांची नियमित देखभाल आणि स्वच्छतेसाठी आवश्यक व्यवस्था पुरविणे  
•    सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये अनिवार्यपणे 'महिलांसाठी स्वतंत्र सुविधां' ची तरतूद
•    यासंबंधी आवश्यक उपनियम आणि विकास नियंत्रण नियमांची निर्मिती आणि अंमलबजावणी करणे
•    सामुदायिक सहभागातून सार्वजनिक सोयीसुविधांच्या देखभालीसाठी त्यांच्या सशुल्क वापरास प्रोत्साहन देणे

पुणे महानगरपालिकेने महिला शौचालये आणि मुतारी सुविधांसाठी स्वतंत्र तरतूद केली आहे. हा नमुना 'पुणे पॅटर्न ऑफ लेडीज् टॉयलेट्स' नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या सात वर्षांमध्ये याअंतर्गत विविध सार्वजनिक ठिकाणी ७०० जागांची निर्मिती करण्यात आली आहे.