पुण्याच्या पूर्वेकडील मुंढवा, खराडी, कल्याणीनगर या भागाचा अत्यंत वेगाने विकास होत आहे. हा भाग घोरपडीवरील अरुंद रस्त्याने मुख्य शहराला जोडला आहे. घोरपडी गावातील काही भाग हा पुणे कॅंटोन्मेंटमध्ये तर काही भाग संरक्षण मंत्रालयाचा आहे. या भागातून पुणे-मिरज आणि पुणे-सोलापूर हा ७०० मीटर अंतराचा रेल्वे मार्ग जातो. त्यामुळे तेथे सातत्याने मोठी वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. स्थानिक नागरिक, नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. २००८ मध्ये पुणे महानगरपालिकेने पुणे-मिरज आणि पुणे-सोलपूर रेल्वे मार्गावर १३ मीटरचा उड्डाणपूल बांधण्यास अनुकूलता दर्शविली आहे. भारतीय रेल्वे, पुणे कॅंटोन्मेंट आणि संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची जागा या उड्डाणपूलाच्या उभारणीसाठी आवश्यक आहे. संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी या प्रकल्पासाठी १२ ऑगस्ट २०१६ रोजी परवानगी दिली आहे.
या प्रकल्पाची तांत्रिक माहिती :
क.1.1. उड्डाणपूलाची लांबी: ४९० मीटर
क.1.2. उड्डाणपूलाची रुंदी: १५ मीटर
क.1.3. अॅप्रोचेसची लांबी: ३८५ मीटर (दोन्ही बाजूंनी)
क.1.4. एकूण कमानी: ४ (३० मीटरच्या २, २५ मीटरची १, २० मीटरची १) उंच भाग १०५ मीटर
क.1.5. बांधकामाचा प्रकार: प्रिकास्ट अॅण्ड प्रिट्रेस्ड ग्रिडर्स
क.1.6. प्रतिबंधक कठडा: १ मीटर लांबीचा आरसीसीचा प्रतिबंधक कठडा