रेड डॉट कॅम्पेन

रेड डॉट कॅम्पेन

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमामध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे हझार्डस वेस्ट (घातक कचरा) व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महानगरपालिका काम करत आहे. या अनुषंगाने स्मार्ट सिटी अंतर्गत औंध -बाणेर क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात ३०,००० मिळकतींसाठी “ रेड डाॅट कॅन्पेन” पायलट प्रकल्पाची सुरूवात पुणे मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मा. ज्ञानेश्वर मोळक, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर,सुनिता वाडेकर,अर्चना मुसळे, बाबुराव चांदेरे ,पी अँड जी चे राजीव श्रीवास्तव व डाॅ केतकी घाडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.हा प्रकल्प स्मार्ट सिटी ,स्वच्छ संस्था,सीईई ,पुणे महानगरपालिका व पी अँड जी संयुक्तपणे राबवत आहेत.या प्रकल्पांतर्गत सॅनिटरी नॅपकिन ,डायपर्स स्वंतत्रपणे गोळा केले जातील व त्यांवर शास्रीय पध्दतीने प्रक्रिया केली जाईल.पुणे महानगरपालिकेने २०१७ पासून स्वच्छ संस्थेच्या मदतीने हा प्रकल्प सुरू केला होता पंरतु त्याचे स्वरूप छोटे होते.मात्र आता लवकरच संपुर्ण शहर पातळीवर हा प्रकल्प राबविला जाणार आहे.