OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

नोंदणी

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ आणि स्थानिक संस्था कर नियम, २०१० नुसार, ज्या विक्रेत्यांची वार्षिक उलाढाल ( आर्थिक वर्ष २०१४-१५ मधील खरेदी आणि विक्री) ५० कोटी रुपयांपेक्षा कमी नाही अशा विक्रेत्यांनी स्थानिक संस्था करासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. केंद्राच्या १५.०८.२०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, जे विक्रेते विदेशी दारु, देशी दारु आणि वाईन इत्यादीचा गोष्टींचा व्यवसाय चालवत आहेत आणि १५ ऑगस्ट, २०१६ रोजी सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात ज्यांच्या व्यापाराची उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे तेदेखील नोंदणीसाठी पात्र आहेत. 

स्थानिक संस्था कर(एलबीटी) नोंदणीसाठी पात्र विक्रेते एलबीटी मुख्य कार्यालयातून नोंदणी फॉर्म घेऊ शकतात. विक्रेत्यांना या फॉर्मसोबत भाडेतत्व करार, पॅन कार्ड प्रती, निवासी पुरावा(वीज बिल, व्हॅट/सीएसटी/बीएसटी, पासपोर्ट साईझ कलर फोटो, शॉपअॅक्ट परवान्याची प्रत, संस्थेची घटना, गेल्यावर्षीचा ताळेबंद, असल्यास संचालक मंडळाचा ठराव, भागीदारी करार, मासिक खरेदीचा अहवाल( नोंदणीच्या तारखेपर्यंत), मालमत्तेचे स्टेटमेंट, शंभर रुपये नोंदणी फी द्यावी लागेल. 

पात्र विक्रेते pmc.mahalbt.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन आवश्यक माहिती ऑनलाईन भरु शकतात.